काही जणांना प्रवास करण्याची प्रचंड आवड असते. विविध देशांतील प्रसिद्ध ठिकाणांना भेट देणे, तेथील संस्कृती, खाद्यपदार्थ या बद्दल जाणून घेणे; यासाठी अनेक पर्यटक उत्सुक असतात. कारण प्रत्येक देशाचे स्वतःचे वेगळे सौंदर्य आणि वैशिष्ट्य आहे. तर आज सोशल मीडियावर एका ब्लॉगरची चर्चा होत आहे, जो भारत ते ऑस्ट्रेलिया असा सायकलवरून प्रवास करतो आहे.

जेरी चौधरी हा इन्स्टाग्राम ट्रॅव्हल ब्लॉगर एक अनोखा प्रवास करतो आहे. तरुणाने सायकलवर त्याचे सामान व्यवस्थित लावून घेतले आहे. तसेच त्याने त्याच्या सायकलवर एक बोर्ड लावला आहे, ज्यावर भारत ते ऑस्ट्रेलिया असा मजकूर इंग्रजी भाषेत लिहिण्यात आला आहे आणि तरुणाने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफार्मची माहिती म्हणजेच इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनेलचे नावसुद्धा लोगोसह नमूद केले आहे. पाहा सायकलस्वाराचा भारत ते ऑस्ट्रेलिया प्रवास…

हेही वाचा…तरुणाने महिंद्रा ट्रॅक्टरचा काढला ‘असा’ हुबेहूब आवाज! VIDEO पाहून आनंद महिंद्राही झाले थक्क…

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, या प्रवासादरम्यान तो कंबोडिया शहराच्या एका ब्रिजवर थांबला आहे, जिथून व्हिएतनाम १०० किलोमीटरच्या अंतरावर असते. व्हिएतनाममध्ये तरुण उद्या पोहचेल आणि त्याचा तीन महिन्यांचा विझा कलेक्ट करेल. तसेच तरुण व्हिडीओत सांगताना दिसत आहे की, हा अनोखा प्रवास जर तुम्हाला ऑनलाइन पाहायचा असेल तर तुम्ही त्याच्या इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनेलला फॉलो करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @jerrychoudhary या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तरुण म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशिया यांसारख्या विविध देशांमधून सायकलने प्रवास करतो आहे आणि या प्रत्येक देशाच्या विविध संस्कृती आणि निसर्गसौंदर्याची अनोखी झलक व्हिडीओद्वारे शेअर करतो आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून सायकलस्वाराच्या अनोख्या प्रवासाचे कमेंटमध्ये कौतुक करताना दिसत आहेत.