भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष “आनंद महिंद्रा” विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. बऱ्याचदा ते त्यांच्या पोस्टमधून व्यवसाय, आर्थिक व जीवन याबद्दल अनेक प्रेरणादायी तसेच अनेक कौतुकास्पद गोष्टी शेअर करत असतात. आनंद महिंद्रा नेहमीच नेटकऱ्यांच्या अनोख्या कौशल्याने प्रभावित होत असतात आणि खास पोस्ट शेअर करत असतात. तर आज त्यांनी एका तरुणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडीओ शेतातील आहे. व्हिडीओच्या सुरवातीला पहिल्यांदा ट्रॅक्टरचे नाव दाखवण्यात येते. ‘महिंद्रा 575 DI’ ट्रॅक्टरमध्ये दोन तरुण बसलेले असतात .त्यानंतर ट्रकमध्ये बसलेला तरुण महिंद्रा 575 DI ट्रॅक्टरवर खूप जास्त सामान असते त्यावेळी ट्रॅक्टर कशाप्रकारे धावतो याचा आवाज काढून दाखवतो आहे. तरुणाने कशाप्रकारे ट्रॅक्टरचा आवाज काढला एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून नक्की बघा.

Son Surprised Mother With CA Result Anand Mahindra react on this
माऊलीच्या कष्टाचं चीज केलं! डोंबिवलीतील भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा झाला सीए; आनंद महिंद्रांनी दखल घेत केली खास पोस्ट
Mahindra SUV discounts in June 2024:
टाटा-महिंद्रकडून ‘एसयूव्ही’च्या किमतीत कपात
woman crushed her lover with a stone
पिंपरी- चिंचवड: मित्राच्या मदतीने प्रेयसीने प्रियकराला दगडाने ठेचले; व्हिडीओ व्हायरल
mumbai hit and run case mihir shah
CCTV Footage: BMW नव्हे, आधी मर्सिडीजमध्ये बसला होता मिहीर शाह; वरळी हिट अँड रन प्रकरणात नवा खुलासा, नंतर बदलली गाडी!
Pune video
Pune : “भाऊ, गरम काय आहे?” ग्राहकाने विचारताच पुणेकर विक्रेत्याने दिले भन्नाट उत्तर, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Why Harleen Deol Catch Video Went Viral After Suryakumar Yadav Stunning Catch
सूर्याची बहीण चंद्रा! सूर्यकुमारच्या कॅचनंतर हरलीन देओलचा कॅच का होतोय व्हायरल? पाहा VIDEO
MS Dhoni New Haircut Photos Viral
माहीच्या नव्या ‘हेअर स्टाइल’ने वेधले सर्वांचे लक्ष; व्हायरल फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘काही दिवसात तो ४३ वर्षांचा होईल यावर…’
women in Mumbai Bhandup chawl dance so gracefully on marathi song
मुंबईच्या चाळीतील महिलांनी केला तुफान डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “बाईपण भारी देवा”

हेही वाचा…आजीने नातवासाठी Adidas च्या लोगोचं शिवलं ‘असं’ खास स्वेटर! VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक…

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुण स्टेअरिंगवर हात ठेवतो आणि तोंडाने महिंद्रा 575 DI ट्रॅक्टरचा हुबेहूब आवाज काढण्यास सुरुवात करतो. हे पाहून आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ रिपोस्ट केला आणि लिहिले की, Amazing! मुलाच्या पोटातचं एक ट्रॅक्टर आहे… तसेच त्यांनी पुढे चिंता देखील व्यक्त केली की, ट्रॅक्टरचे इंजिन बंद पडले होते म्हणून तरुणाने असं केलं नसावे आणि याबरोबरच एक स्मायली इमोजी देखील पोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) @anandmahindra अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून तरुणाच्या कौशल्याचे विविध शब्दात कौतुक करताना दिसून आले आहेत. महिंद्रा 575 DI हा एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर आहे ; ज्यामध्ये चार सिलेंडर आहेत. तसेच या ट्रॅक्टरचे इंजिन २७३० सीसी आहे ; जे १९०० आरपीएम आणि उसाचं टॉर्क जनरेट करून शेतीची कामे सुलभ आणि जलद करते.