सोशल मीडियावर एका बाईक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून प्रत्येकाने धडा घेतला पाहिजे असा आहे. रस्त्यावर वाहन चालवाणाऱ्या प्रत्येकाने अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण काहीवेळा कार किंवा मोठ्या वाहनांच्या चुकीचा परिणाम बाईक चालकांना भोगावा लागतो. अशाच प्रकारे एका कार चालकाची चूक बाईकस्वाराच्या जीवावर बेतली आहे. यामुळे कार आणि बाईक ड्रायव्हर दोघांनीही हा व्हिडीओ पाहावा आणि काळजी घ्यावी.

व्हिडीओमध्ये एक तरुण बाईकवरुन येत असल्याचे दिसत आहे. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारचा दरवाजा कार चालक मागे- पुढे न पाहता उघडतो. यावेळी बाईकस्वार जोरात त्या कारच्या दरवाज्यावर आदळतो, आणि बाजूने जात असलेल्या भल्यामोठ्या ट्रकला जोरात धडकतो आणि थेट ट्रकच्या चाकाखाली येतो. सुदैवाची गोष्ट म्हणजे, यात बाईक चालक थोडक्यात बचावतो. यावेळी बाईकस्वार चाकाखालून घसपटत पुढे गेला नसता तर त्याचा जीव जाऊ शकला असता.

चालक कारचा दरवाजा अशाप्रकारे अचानक उघडेल याची बाईकस्वारालाही कल्पना नव्हती. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक कार चालक पुढे मागे न पाहता कारचा दरवाजा उघडतात, त्यामुळे अशा कार चालकांना जागरुक करण्यासाठी हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.

हा व्हायरल व्हिडीओ आत्तापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. ज्यावर अनेकजण कार चालकाच्या अशा निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत आहेत. अपघाताच्या या व्हिडीओने तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल.