आजच्या काळात निम्म्याहून अधिक लोक फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपस्थित आहेत आणि अनेक जण सक्रिय सुद्धा असतात. हे एक असं व्यासपीठ आहे जिथे देशातील ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत प्रत्येकजण आपले विचार मांडत असतात. तुम्हा सर्वांना माहित असेलंच की फेसबुक गेल्या १७ वर्षांपासून याच नावानं ओळखलं जात होतं, परंतु आता ते री-ब्रँड केलं गेलं आहे. होय, हे अगदी खरंय. यापुढे फेसबुक आता ‘मेटा’ नावाने ओळखण्यात येणार आहे, याची माहिती खुद्द फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे.

आणखी सांगायचं झालं तर नव्या कंपनीचं लक्ष आता एक मेटाव्हर्स तयार करण्यावर असणार आहे. ज्यात असं आभासी जग सुरू करण्यात येणार आहे जिथे ट्रान्सफर आणि कम्यूनिकेशनसाठी विविध टूल्स वापरण्यात येणार आहेत. फेसबूकच्या नव्या नावाची ही बातमी येताच सोशल मीडिया यूजर्सनी मात्र वेगवेगळ्या मीम्सचा अक्षरशः पाऊस पाडण्यास सुरूवात केलीय.

फेसबुकच्या या नव्या हालचालीसंदर्भात ट्विटरवर खिल्ली उडवली जात आहे. फेसबूकला कंटाळून ट्विटरवर उड्या घेणारे युजर्स पुन्हा एकदा फेसबुकचा आनंद घेताना दिसून येत आहेत तर काही युजर्स मजेदार मीम्स शेअर करत आहेत. फेसबुक रि-ब्रँडिंग करून मुख्य मुद्द्यांवरून लक्ष हटवत असल्याचंही काही युजर्सचं म्हणणं आहे. जगभरातील सोशल मीडियावर #Meta हा हॅशटॅग ट्रेंडवर आहे. या हॅशटॅगसोबत युजर्सनी क्रिएटिव्ह स्पिन देण्याचा प्रयत्न केला, तर काही युजर्सना ‘फेटा’ आणि ‘मीट’ सारख्या शब्दांसोबत ब्रँडच्या लोगोला फोटोशॉप करण्याचा मोह आवरता आला नाही.

इथे पाहा काही मजेदार मीम्स:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुर्वी Google ने सुद्धा असाच प्रयत्न केला होता. Google ने आपल्या सर्व सेवांसाठी अल्टाबेट इंक (अल्फाबेट इंक.) नावाची पॅरेंट कंपनी तयार केली होती. २००४ मध्ये मार्क जकरबर्गने सांगितलं होतं की, फेसबुकचं भविष्य मेटावर्स कॉन्सेप्टमध्ये असणार आहे. मेटेवर्सचा अर्थ आहे की, एक असं जग ज्यात सर्व लोक फिजिकली उपस्थित नसूनही असल्यासारखे असतील. मेटावर्स हा शब्द वर्चुअल रिअॅलिटी आणि ऑग्युमेंट रिअॅलिटी सारखाच आहे.