सोशल मीडियावर दररोज नवनवीन जुगाडाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिवाय सध्याच्या काळात कोण कधी आणि कसला जुगाड करेल हे सांगता येत नाही. कधी कुणी कारला हेलिकॉप्टर बनवतो, तर कधी कुणी विटातून कुलर बनवतो. सध्या अशाच एका भन्नाट जुगाडाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे. खरं तर अनेक लोक आपली रोजची कामे सोपी व्हावी यासाठी जुगाड करत असतात. सध्या आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी अशाच एका अप्रतिम जुगाडाचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो त्यांना त्यांच्या आईने पाठवल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या व्हिडीओमध्ये एक माणूस बाईकवर धान्य दळताना दिसत आहे, जे पाहिल्यानंतर तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल यात शंका नाही. कारण या व्हिडीओतील व्यक्तीने चक्क बाईकलाच पिठाची गिरणी बनवल्याचं दिसत आहे. व्हिडीओतील व्यक्ती बाईकवरील मशीनच्या आउटलेटमध्ये मूठभर धान्य टाकताना दिसत आहे. त्याने मशीनमध्ये टाकलेले धान्य काही वेळातच जुगाडू गिरणीमधून बारीक होऊन बाहेर येताना दिसत आहे.

हेही पाहा- टॉम क्रूझबरोबर असणारे ‘हे’ दोघे आहेत तरी कोण? व्हायरल फोटोची स्टोरी आहे खूपच खास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना अधिकारी अवनीश शरण यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “माझ्या आईने मला हा व्हिडिओ पाठवला आहे. ही व्यक्ती ही आटाचक्की मशीन घेऊन आमच्या घरी आला होता. काय नावीन्य आहे.” सध्या या व्यक्तीच्या व्यवसाय करण्याच्या अनोख्या जुगाडाचे नेटकरी मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. तर अनेकांना तो आवडल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय या व्यक्तीच्या नवीन तंत्रज्ञानाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “नवीन स्टार्टअप! अप्रतिम” तर आणखी एकाने माझ्या गावामध्ये मी अशा मशीन पाहिले आहेत, असं लिहिलं आहे.