कोणाचं नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही, असं म्हटलं जातं. सोशल मीडियावर अशा अनेक बातम्या आपण पाहत असतो, ज्यामध्ये काही लोक क्षणात श्रीमंत होतात. सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीचं नशीब रात्रीत पालटलं असून तो करोडपती बनला आहे. पैसा प्रत्येकाला हवा असतो, यासाठी काही लोक रात्रंदिवस कष्ट करतात, तर अनेकजण लॉटरीची तिकिटे खरेदी करुन परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतात. परंतु, क्वचितच कोणीतरी लॉटरीमुळे श्रीमंत बनतो. ज्यामध्ये मायकल सोपगेस्टल नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे. जे एका कारकुनाच्या चुकीमुळे करोडपती बनले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील रहिवासी असलेल्या मायकल सोपगेस्टल यांनी एका कारकुनाच्या चुकीमुळे मोठी लॉटरी जिंकली आहे. मायकल हे अनेकदा इंडियाना मार्गे मिशिगनला त्याच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी जातात. मिशिगन लॉटरीनुसार, यावेळी ते एक ‘लकी फॉर लाइफ’ लॉटरीचे तिकिट खरेदी करतात.

हेही पाहा- हातपंपातून पाण्याऐवजी येऊ लागलं दूध? लोकांनी बाटल्या आणि पिशव्यांमधून सुरु केली लूट, VIDEO पाहून डोकंच धराल

दरवर्षी मिळणार २५ हजार डॉलर –

मायकलने लॉटरी अधिकाऱ्यांना सांगितलं, “१७ सप्टेंबर रोजी गोलो गॅस स्टेशनवरील एका विक्रेत्याने (कारकुनाने) चुकून एकाच सोडतीसाठी १० अंकाचे तिकीट छापले, जे मी खरेद केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सकाळी माझे तिकीट तपासले असता, दरवर्षी २५ हजार डॉलरचे बक्षीस जिंकल्याचं पाहिलं. यावेळी मी खूप आनंदी झालो.”

एकाच वेळी घेणार पैसे –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लॉटरीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, नुकतेच लॉटरी मुख्यालयात बक्षीसावर दावा करण्यासाठी एक व्यक्ती आला होता. यावेळी त्याने आयुष्यभर वर्षाला २५ हजार डॉलरऐवजी एकरकमी ३.२५ कोटी रुपये घेण्याचा पर्याय निवडला. मायकेल यांनी सांगितलं की, मिळालेली पैसे ते प्रवासासाठी वापरणार असून उर्वरित रक्कम पुढील आयुष्यासाठी खर्च करणार आहेत. ‘लकी फॉर लाइफ’ लॉटरी वॉशिंग्टन, डी.सीसह जवळपास दोन डझन राज्यांमध्ये खेळली जाते.