आजकाल सोशल मीडियावर अनेक धक्कादायक घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकदा आपणही थक्क होतो. सध्या देशाची राजधानी दिल्लीतील सिद्धार्थ नगर भागातील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे. शिवाय ही घटना खूप भयंकर असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका तरुणाने फ्लॅटची बेल वाजवली आणि आतील व्यक्तीने दरवाजा न उघडल्याने त्याने थेट दरवाजावर गोळीबार केल्याचं दिसत आहे. या घटनेमुळे लोकांना पोलिसांचा काही धाक राहिला नसल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.

या व्हिडीओमध्ये दोन तरुण एका फ्लॅटची बेल वाजवताना दिसत आहेत. परंतु या फ्लॅटचा दरवाजा कोणीही उघडत नाही. त्यामुळे हे तरुण वाट बघतात आणि दरवाजावर थेट गोळीबार करायला सुरुवात करतात. दरम्यान, या घटनेत कोणाचेही नुकसान झालेले नसल्याची माहीती समोर आली आहे. तर या तरुणांनी एकूण ५ गोळ्या झाडल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हेही पाहा- अर्शदीपने स्टंप्स तोडताच पंजाब किंग्जची मुंबई पोलिसांकडे तक्रार; पोलिसांनी दिलेला जबरदस्त रिप्लाय होतोय Viral

हेही पाहा- पक्षी धडकल्याने विमानाच्या इंजिनला हवेतच आग लागली अन्…, थरारक Video पाहून अंगावर येईल शहारा

ही घटना दक्षिण-पूर्व दिल्लीतील सिद्धार्थ नगरमधील असून रविवारी सकाळी ती घडली आहे. व्हिडिओमध्ये तोंडाला मास्क लावलेले दोन तरुण पायऱ्या चढताना दिसत आहेत. त्यातील एकजण खाली उभा राहतो, तर दुसरा फ्लॅटच्या दरवाजाची बेल वाजवताना दिसत आहे. बेल वारंवार वाजवूनही कोणीही दरवाजा न उघडल्यामुळे रागवलेला तरुण थेट बंदूक बाहेर काढतो आणि ज्या फ्लॅटची बेल वाजवत होता त्याच फ्लॅटच्या दरवाजावर एकापाठोपाठ दोन गोळ्या झोडताना दिसत आहे. त्याने गोळीबार करुनही हा दरवाजा उघडला नसल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, व्हिडीओत हे दोन्ही तरुण बिनधास्तपणे खालच्या मजल्यावर जातात आणि तिथेही गोळीबार करतात. ही सर्व घटना इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांनी या घटनेवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. तर या घटनची सखोल चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.