Accident video: आजच्या जगात कुणाला मागं राहायचं नाही, सगळ्यांना पुढं जायचं असतं. तुम्ही ड्रायव्हींग करत असाल तर ही गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवते. प्रत्येकाल आपली गाडी पुढं न्यायची घाई असते. अशावेळी कुठला ड्रायव्हर वा गाडी तुमच्या मार्गात आली तर राग अनावर होता. आणि अशावेळी रस्त्यावर भांडणं होतानाही आपण पाहतो. ट्रक चालकांची मुजोरी तर नवी नाही, भलेमोठे ट्रक रस्त्यावरील छोट्या छोट्या गाड्यांना कसे ओव्हरटेक करतात हे आपण अनेकदा पाहतो. अशावेळी अनेकदा अपघातही होतात. मात्र तरी देखील या ट्रक चालकांची मुजोरी कमी होताना दिसत नाही, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ट्रक चालकाने चक्क एका लग्नाच्या कारला धडक दिलीय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ट्रक चालकाची मुजोरी

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक ट्रक ड्रायव्हर एका लग्नाच्या कारला मुद्दाम ओव्हरटेक करत आहे. यावेळी तो मुद्दाम कारच्या बाजुनेच आपला ट्रक चालवत आहे, आणि मोठ मोठ्यानं हसत आहे. दरम्यान ट्रक ड्रायव्हर जोरात बाजुच्या कारला धडक देतो आणि पुढे जातो. यामध्ये कारचे आरसे पूर्णपणे तुटतात. पुन्हा तो ट्रक ड्रायव्हर गाडीला पूर्णपणे ट्रक घासतो आणि वेगात पुढे जातो. यामुळे इतर गाड्याही कारवर आदळतात आणि अपघात होतो. आश्चर्याची बाब म्हणजे, हा सर्व प्रकार हा कारचालकच आपल्या मोबाईलमध्ये शूट करतोय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: प्रेयसीला मिठी मारत मेट्रोखाली मारली उडी, कोलकता येथे लव्हस्टोरीचा दुख:द ‘द एन्ड’…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत. तर ट्रक चालकावर लवकरात लवकर कडक कारवाई करावी अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.