Viral video: सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. भारतीतीलच काय तर महाराष्ट्रातील असे अनेक भाग आहेत, जिथे थंडीने उच्चंक गाठला आहे. मधल्या काही काळात अशा काही बातम्या देखील समोर आल्या आहेत की थंडीमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. त्यामुळे थंडीत काळजी घेण्याची गरज आहे. हिवाळ्याच्या ऋतुत धुक्याची चादर सर्वत्र पसरलेली बघायला मिळत आहे. धुक्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं दिसून येतंय. तर काही ठिकाणी धुक्यामुळे रस्ते अपघातही झाले आहेत. मात्र धुक्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून एका ट्रक चालकाने एक जीवघेणा प्रयोग केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून धुक्याचंही प्रमाण वाढलंय. सध्या सोशल मीडियावर अपघाताचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या महामार्गावर असंख्य वाहनांची ये-जा दिसत आहे. अशातच रस्त्यावरुन जाणाऱ्या गाडीतील प्रवाशाने ट्रक चालकाचा धक्कादायक प्रकार मोबाईमध्ये कैद केला आहे. व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, वेळ सकाळची आहे. सकाळची वेळ असल्याने संपूर्ण परिसरात धुक्याची चादर पसरलेली आहे. दरम्यान वाहनांच्या गर्दीतून रस्त्यावर एक ट्रक धावत असतो. परंतू जाणाऱ्या या ट्रकच्या पुढच्या भागावर एक व्यक्ती उभा आहे. व्यक्तीने पाढंऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. व्यक्तीचा जर तोल गेला तर भयानक अपघातही होऊ शकतो याची याला जरही कल्पना नाही.

काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. मग स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. पण, व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आधी पाया पडला, कान पकडून माफी मागितली अन् देवीची मूर्ती घेऊन पसार; मंदिरातील चोरीचा VIDEO व्हायरल

वारंवार अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात; मात्र तरीही लोक यातून धडा घेताना दिसत नाही हेच खरं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ एक्सवर@ChapraZila या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हा व्हिडीओ पाहून नेटकरी असे स्टंट टाळण्याचे आवाहन करत आहेत.