Truck crashes toll booth video: टोल द्यायचा कंटाळा आला म्हणून कोणी वाद घालतो, कोणी चोरून निघून जातो, पण एका ट्रकचालकाने जे केलं त्यानं इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. सोशल मीडियावर सध्या एक थरारक CCTV व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिसतं की एक ट्रक थेट टोल बूथमध्ये घुसतो आणि त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करतो. ही घटना पाहून अनेकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

अगदी क्षणभरात संपूर्ण टोल प्लाझा नाहीसा होतो आणि त्या आवाजाने परिसर हादरतो… एक ट्रक धडधडत येतो आणि पुढे जे घडतं, ते पाहून नेटकऱ्यांचे डोळे थक्क होतात. टोल भरायचा नाही म्हणून काही लोक वाद घालतात, तर काही चोरपावलांनी सुटतात… पण, या ट्रकचालकाने जे केलं ते अगदी सिनेमात शोभेल असं धक्कादायक स्टंट ठरलं. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय, तो पाहून कुणी थरार अनुभवतोय, तर कुणी सरकारच्या टोल पद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं करतंय. हे नेमकं काय आणि कसं घडलं? वाचा सविस्तर…

सर्वसामान्य दिवसांप्रमाणे टोल प्लाझावर वाहनांची वर्दळ सुरू असते, तेवढ्यात अचानक एक ट्रक प्रचंड वेगात येतो आणि थेट टोल बूथवर घुसतो. टक्कर इतकी जबरदस्त असते की टोल बूथ हवेत उडतो आणि चुरगळून जातो. टोल बूथमध्ये बसलेला कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

व्हिडीओ पाहून थरकाप उडेल

हा थरारक प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ट्रक थांबण्याऐवजी पुढे न थांबता पसार होतो. त्यानंतर परिसरात गोंधळ उडतो, सुरक्षारक्षक पळत सुटतात आणि वातावरणात धुळीचा भयंकर गुबार उठतो. हे दृश्य एखाद्या अ‍ॅक्शन चित्रपटात शोभेल असंच वाटतं!

इंटरनेटवर अशा घटना काही नवीन नाहीत. कधी कारचालक टोलच्या गेटवर धडक मारून निघतो, तर कधी ट्रकचालक टोल बूथच उडवतो. टोलवर होणाऱ्या वाद-विवादांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियावर अनेकदा टोल कर्मचाऱ्यांनीही वाहनचालकांना मारहाण केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

लोक म्हणतात – “हेच होतं बाकी!”

@NazneenAkhtar23 या X हँडलवरून शेअर करण्यात आलेला व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून, यावर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने म्हटलं, “सरकारच्या लुटीला कंटाळूनच लोक असं करत असावेत!” दुसरा म्हणतो, “टोल हे एकप्रकारे गुंडगिरी आहे.” तिसरा तर थेट म्हणतो, “ट्रकवाला बिचारा रोजच्या टोलला वैतागला असणार!”

येथे पाहा व्हिडीओ


ही घटना केवळ एक अपघात नव्हे, तर टोल व्यवस्थेवर उठलेला गंभीर प्रश्न आहे. ज्या पद्धतीने वाहनचालकांचा संताप उफाळून येतो आहे, त्यावर प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.