Brothers Save Family from Drowning: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. रस्त्यावरून चालताना किंवा गाडी चालविताना व्यक्तीची एक चूक जीवासाठी किती घातक ठरू शकते हे सर्वांना माहीतच आहे. कोणतं संकट कुठे येईल हे कोणीही सांगू शकत नाही. जेव्हा एक कुटुंब निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांना कल्पनाही नव्हती की, काही वेळातच ते संकटाच्या खाईत लोटले जाणार आहेत. आनंदी वातावरण, छायाचित्रं आणि सहलीचा उत्साह काही क्षणांतच भीतीच्या किंकाळ्यांमध्ये बदलला. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…
जीवनातले खरे हीरो तेच असतात, जे संकटाच्या क्षणी कोणताही विचार न करताही मदतीसाठी पुढे सरसावतात. अशीच एक हृदयविदारक घटना समोर आली आहे, जी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. थार गाडी अनियंत्रित होऊन थेट कालव्यामध्ये कोसळली आणि काही क्षणांत ती बुडू लागली. पण त्या क्षणी दोन धाडसी भावांनी देवदूतासारखी एंट्री घेतली. त्या कुटुंबाला वाचविण्यासाठी ते पुढे सरसावले.
हृदयविदारक दृश्य: थार गाडी कालव्यात पडल्यानं कुटुंब अडकलं गाडीत
व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक थार जीप कालव्यामध्ये पडली असून, त्यामध्ये एक संपूर्ण कुटुंब अडकलं आहे. पाण्याचा प्रचंड वेगवान प्रवाहामुळे गाडी हळूहळू बुडू लागली होती. बाहेर असलेले लोक बघ्याची भूमिका घेत होते, तेही हादरले होते. पण, तेव्हा हे दोन भाऊ कोणतीही भीती न बाळगता, थेट कालव्यामध्ये उडी घेतात.
गाडीची काच फोडून अडकलेल्या जीवांची फिल्मी स्टाईल सुटका
गाडीचा दरवाजा उघडता येत नव्हता आणि त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थारची काच फोडली. मग एकामागोमाग एक करून गाडीत अडकलेल्या सर्व कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढलं. हे दृश्य अक्षरशः एखाद्या अॅक्शन सिनेमासारखं वाटत होतं. या गाडीत लहान मुलंही होती. ती फार घाबरल्याचे दिसत होते. परंतु ,संपूर्ण कुटुंब आता सुखरूप असल्याचे व्हिडीओतून दिसत आहे.
येथे पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर भावूक प्रतिक्रिया, “हे खरे हीरो!”
या धाडसी रेस्क्यूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक दोन्ही भावांचं कौतुक करीत आहेत. एका युजरने लिहिलं, “हे तर रिअल लाइफचे सलमान आणि अक्षय आहेत!” तर दुसऱ्यानं म्हटलं, “असेच खरे हीरो समाजात हवेत, त्यांना सॅल्यूट”.
या थरारक घटनेमुळे हे पुन्हा सिद्ध झालं की, खरे नायक पडद्यावर नाही, तर समाजात असतात, ज्यांच्या धाडसामुळे एखादं आयुष्य वाचू शकतं.