राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात दोन बैल एका इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये घुसल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. दोन भटके बैल गजसिंगपूर येथील तेह बाजार येथील एका इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये घुसले आणि एकच गोंधळ उडाला. शोरूम चालकासह तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी तेथून पळून आपला जीव वाचवला असला तरी, दोन्ही भटके बैल इलेक्ट्रॉनिक शोरूममध्येच तांडव करत राहिले. बऱ्याच अडचणींनंतर दोन्ही बैलांना दुकानाबाहेर काढण्यात शोरूम चालकांना यश आले. एवढेच नाही तर इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये प्रवेश करण्यापूर्वीच या बैलांची रस्त्यावरही मारामारी सुरूच होती.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगंगानगर जिल्ह्यातील गजसिंगपूर शहरातील तेह बाजार येथील एका इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये दोन बैल भांडण करता करता घुसले. ही घटना घटना गजसिंगपूर येथील तेह बाजार येथील राज इलेक्ट्रॉनिकमध्ये घडली. बराच वेळ हे दोन्ही बैल इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये राहून मारामारी करताना दिसले.

(हे ही वाचा: Video: जग घुमिया चाय! ‘या’ राजस्थानी मास्टरशेफचं कौशल्य पाहून तुम्हीही कराल कौतुक)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुकानात ठेवलेले वॉशिंग मशीन आणि एलईडीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान शोरूमचे संचालक व इतर कर्मचाऱ्यांनी दोन्ही बैलांना शोरूममधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अथक प्रयत्न करूनही दोन्ही बैल बाहेर जात न्हवते. अखेर काही वेळ घालवून दोन्ही बैल स्वतःहून इलेक्ट्रॉनिक शोरूममधून निघून गेले. त्यानंतर शोरूमचालकाने सुटकेचा नि:श्वास सोडला. इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. हे फुटेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.