Two Crores South Mumbai Home Tour Video: मुंबईतील घरांच्या किमती हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. करोडो रुपये खर्च करूनही मुंबईतील ‘पॉश’ भागांमध्ये साधी वन रूम किचनची खोली मिळणं सुद्धा कठीण असतं. अशातच एका दादाने चक्क साऊथ मुंबईतला एकदम कमाल वन बीएचकेचा फ्लॅट दाखवला आहे. मस्करीत बनवलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांना विशेषतः मुंबईत राहिलेल्या व राहणाऱ्या सगळ्यांना प्रचंड आपलासा वाटत आहे. काहींनी तर हा व्हिडीओ पाहताना आम्हीच गुदमरून जाऊ असं वाटत होत असल्याचं म्हटलं आहे.
@me_palve या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये आजाओ, दिखा दूंगा म्हणत एक मुलगा घराची सैर करायला म्हणून आपल्याला घेऊन जातो. हे घर ‘सुरु होताच संपलं की काय’ असा प्रश्न पडावा इतकं आलिशान असतं. बेडरूममध्ये शिरताच दादा आपल्याला सोफा कम बेडची झलक दाखवतो, उपहासात्मक व्हिडीओ असला तरी या घरात अगदी एसी पासून ते गिजर पर्यंत सगळ्या सुख सोयी असल्याचे दिसून येत आहे. हॉल वजा बेडरूमनंतर दादा किचनमध्ये शिरतो. इथे एक पाऊल टाकताच भांडी खडाखडा वाजायला लागतात. किचनला जोडूनच बाथरूम पण आहे. ज्यात दादाची उंचीही मावत नाहीये. मग एवढं सगळं दाखवल्यावर तुम्हाला वाटेल की चला संपलं, तर नाही दादा बोनस धमाका म्हणून या घराची गच्ची सुद्धा दाखवतो.
साऊथ मुंबईतील अडीच कोटी किमतीच्या घराचा Video
हे ही वाचा<< “श्रावणात नेते किती पॉर्न पाहतात..”, राहुल गांधींवरील टीकेनंतर पप्पू यादव भडकले; म्हणाले, “तिसरं लग्न करणं.. “
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी आता आम्हाला आमची घरं महाल वाटू लागली आहेत अशा कमेंट करून या व्हिडिओला शेअर केलं आहे. तर काहींनी मुंबईकरांची दया येते असंही म्हटलं आहे. इतकं कोंडून जगतानाही मुंबईकर नेहमी स्वच्छंदी व स्वतंत्र कसे विचार करतात हा प्रश्नच पडतो, कदाचित यालाच मुंबईचं स्पिरिट म्हणत असावेत. तुम्हाला ही हा व्हिडीओ आपलासा वाटतोय का हे कमेंट करून नक्की कळवा.