Viral Video: एका कॉलवर आपल्यासाठी धावत येणारा, आपली प्रत्येक सुख-दुःख जाणून घेणारा तो एक ‘मित्र’ प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो. पण, मानवांप्रमाणेच प्राण्यांमध्येहीदेखील घट्ट मैत्री असते. याचं एक उत्तम उदाहरण आज सोशल मीडियावर पाहायला मिळालं आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी सुप्रिया साहू यांनी मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील तमिळनाडूमधील थेप्पाकडू कॅम्पमधील दोन हत्ती मित्रांची एक खास गोष्ट सांगितली आहे.

मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील तमिळनाडूमधील थेप्पा कॅम्पमध्ये दोन हत्ती ५५ वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. भामा (वय ७५) आणि कामा (वय ६५) असे यांचे नाव असून हे दोघे खरोखरचं शूर, निष्ठावान आणि प्रेमळ आहेत. एके दिवशी कामा हत्तीला जंगलात चरायला नेत असताना बिबट्याने त्याला जखमी केले. तेव्हा भामा हत्तीने एकट्याने बिबट्याचा पाठलाग करून आपल्या मित्राचे प्राण वाचवले. कामावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर तो अनेक वर्ष जखमी होता. पण, त्या दोघांनी धैर्याने सर्व गोष्टींचा सामना केला.

हेही वाचा…माकडाने स्वयंपाकघराच्या ओट्यावर मांडलं ठाण; पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव, पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

कॅम्पमध्ये जेवताना या दोन्ही मित्रांना नेहमी एकमेकांच्या शेजारी उभं राहून ऊस खायला आवडते आणि हे ऊस फक्त एकालाच देण्याची हिंमत कोणी करू शकत नाही, ते नेहमी दोन्ही मित्रांना द्यावे लागते. प्रेम, स्नेह, निष्ठा आणि मैत्रीचं उदाहरण आणि सोन्यासारखे हृदय असणाऱ्या या दोन भव्य हत्तींचे आणि आशियातील सर्वात जुन्या थेप्पाकडू कॅम्पमधील इतर २७ हत्तींची काळजी घेणाऱ्या येथील कर्मचाऱ्यांचे आयएएस अधिकारी यांनी पोस्टमध्ये कौतुक केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर ही पोस्ट आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांच्या अधिकृत @supriyasahuias या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत तुम्हाला भामा व कामा या खास मित्रांची झलक पाहता येईल आणि कॅप्शनमध्ये त्यांच्या मैत्रीची अनोखी गोष्टही वाचता येईल.