Leopard Attack On Safari Vehicle : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जंगल सफारीच्या एका व्हिडीओमुळं खळबळ उडाली आहे. बिबट्या,वाघ, सिंहासारखे हिंस्र प्राणी मानवी वस्तीत मुक्त संचार करून माणसांवर हल्ला करत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. रस्त्यावरून प्रवास करताना किंवा जंगलात भटकत असताना वन्य प्राणी माणसांवर जीवघेणा हल्ला करतात. तसेच राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास हे प्राणी हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. जंगल सफारीचा अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. जंगल सफारी करताना सफारी वेहिकलवर ४ चित्त्यांनी झडप घेतली. चित्त्यांनी सफारी वेहिकलवर झेप घेताच पर्यटकांचा थरकाप उडाला. चित्त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही लोक जंगल सफारीसाठी गेले होते, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. जंगलाच्या मधोमध सफारी थांबल्यावर लोकांनी जंगलाच्या अप्रतिम दृश्याचे व्हिडीओ आणि फोटो काढायला सुरुवात केली. मात्र, आपण एखाद्या धोकादायक प्राण्याशी सामना करणार आहोत याची त्यांना कल्पना नव्हती.व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन चित्ते अचानक सफारीमध्ये घुसते. चित्त्याला पाहून सुरुवातीला काही लोक घाबरले. सर्वजण प्रचंड घाबरले होते. मात्र गार्डनने त्यांना जीपमध्येच स्तब्ध बसून राहा असे सांगितले. तितक्यात जीप समोर आणखी 2 चित्ते आले. त्यातील एक चित्ता तर थेट जीपमध्ये येऊन बसला.

vladimir puting and kim jong
पेहले तुम! कारमध्ये बसण्यावरून रशिया आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांची एकमेकांना विनंती, सर्वांत आधी कोण गेलं गाडीत?
At Gandhinagar in Digras taluka sand smugglers attacked the kotwal along with Talathi  Yavatmal
मस्तवाल वाळू तस्करांचा तलाठी, कोतवालावर हल्ला….चित्रफितीत जे दिसतेय….
dress , teachers, Nashik,
गडद, विचित्र नक्षीकाम, चित्र असणाऱ्या पेहरावास मज्जाव, नाशिक मनपा प्रशासनाधिकाऱ्यांची शिक्षकांना सूचना
Kisan Kathore, Bhiwandi,
भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रेंच्या विजयापेक्षा किसन कथोरेंचीच चर्चा अधिक
Viral video shows dog travelling in Mumbai local netizens say smarter than many Mumbaikars snk 94
“मुंबईकरांपेक्षा हुशार आहे हा कुत्रा”, लोकलमध्ये प्रवास करताना चक्क कुत्र्याने पाळली शिस्त, Video Viral नेटकरी झाले अवाक्
nashik, Dr Vijay Bhatkar, Dr Vijay Bhatkar in nashik, mahiravani village, Sant Shree Dnyaneshwar Mauli Child Sanskar Camp,
परम संगणक निर्मितीला किती खर्च आला ? विद्यार्थ्यांची जिज्ञासा अन् डॉ. विजय भटकर यांचे हितगूज
Cancel contract if the road works are not completed by June 7 Additional Municipal Commissioner Abhijit Bangar ordered
मुंबई : रस्त्यांची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण न झाल्यास कंत्राट रद्द करा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा आदेश
Maharashtra Ssc Results 2024 Know How To Download Msbshse Digital Marksheet
SSC Results 2024: १०वीचा निकाल जाहीर; तुमची डिजिटल मार्कशीट कशी डाऊनलोड कराल? जाणून घ्या

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: खरा खुरा ‘बगिरा’ जेव्हा डोळ्यांसमोर येतो; या दुर्मिळ प्राण्यासमोर सिंह देखील होतो फेल

चित्त्याचा हा थरकाप उडवणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय,“चित्ते तुम्हाला पाहत होते की तुम्ही वाघांना पाहत होता?”. अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, “तुम्ही पिंजऱ्यातून चित्त्याला पाहत आहात आणि चित्ता बाहेर फिरत आहेत.” जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडला आहेत. त्यामुळे जंगल सफारी करताना किंवा रानावनात भटकताना पर्यटकांनी प्राण्यांच्या जवळ जाऊ नये. जंगलातील नियमांचे पालन करावे, अशा सूचना वनविभागाकडून पर्यटकांना दिल्या जातात.