सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ पहायला मिळतात. आजकाल वन्य प्राण्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळत आहे. प्राण्यांशी संबंधीत व्हिडीओ कायमच चर्चेत असतात. वन्य प्राणी आता हळूहळू मानवी वस्तीकडे येत असून त्यांच्या हल्ल्याचेही बरेच व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. अंगावर काटा आणणारे अनेक शिकारीचे व्हिडीओ इंटरनेटवर फिरत असतात. कोण कधी अचानक कोणावर हल्ला करेल याचा काही नेम नसतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे त्यामध्ये ज्यामध्ये रात्री घराबाहेर काळा बिबट्या दिसला आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
ब्लॅक पँथर ही बिबट्यांची अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे. खोल जंगलात राहणाऱ्या या वाघाचं क्वचितच दर्शन होतं. त्यामुळे हा काळा बिबट्या पाहायला देखील नशीब लागतं असं म्हटलं जातं. मात्र तो असा अचानक घराबाहेर आल्यावर कुणीही घाबरुन जाईल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तो बिनधास्त आणि बेधडकपणे घराच्या बाहेर फिरत आहे.IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरवरून शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे, ‘कल्पना करा की कोणीतरी तुम्हाला असे भेटायला येत आहे.
ब्लॅक पँथर कातडीचा रंग त्वचेतील “मेलनिन’ या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. या द्रव्याचे प्रमाण जास्त झाल्यास, कातडी काळी किंवा गडद रंगाची होते. काळ्या बिबट्याच्या बाबतीत हेच होते. त्याच्या शरिरात “मेलनिन’चे प्रमाण जास्त असल्यामुळे तो काळा किंवा गडद रंगाचा होतो. त्याच्या शरिरारवर नेहमीच्या बिबट्याप्रमाणे काळे ठिपके असतात, पण गडद रंगामुळे ते अगदी जवळ गेल्याशिवाय दिसू शकत नाहीत. या रंगबदलामुळे प्राण्याच्या वर्तणुकीत किंवा स्वभावात काही फरक पडत नाही. ते त्यांच्या कुळातील प्राण्यांप्रमाणेच वागतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: तहानेने व्याकूळ झाला होता साप; तरुण स्वतःच्या हाताने पाणी पाजायला गेला आणि…
दरम्यान, जंगलातील प्राण्यांचे असे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. त्यांच्या थराराक व्हिडीओंना नेहमीच नेटकऱ्यांची पसंती असते. आत्तापर्यंत असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. लोकांना वन्य जीवन, प्राणी, यांमध्ये जास्त रस असल्यामुळे ते असे व्हिडीओ वारंवार पाहतात