Viral Video: ते म्हणतात की प्रेमाला भाषा माहित नसते आणि दोन गोंडस ठिपकेदार घुबडांनी हे सिद्ध केले. झाडाच्या फांदीवर बसलेल्या या दोन पक्ष्यांच्या रोमँटिक क्षणाने सोशल मीडियावर लोकांना मंत्रमुग्ध केले आणि प्रेक्षकांना हसवले. वन्यजीव छायाचित्रकार आरजू खुराणा यांनी हा हृदयस्पर्शी क्षण टिपला आणि सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताच, ही क्लिप प्रत्येक प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली. या निष्पाप पक्ष्यांच्या गोंडस कृतींनी लोकांची मने जिंकली आणि त्यांना ‘सर्वात गोंडस पक्षी जोडपे’ अशी उपमा दिली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही प्रेमात पडाल.
जर घुबडाचे वैयक्तिक आयुष्य गुप्तपणे कॅमेऱ्यात कैद केले असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका झाडावर दोन घुबड बसलेले असतात, ते दोघेही एकत्र इतके गोंडस दिसतात की तिने त्यांना तिच्या कॅमेऱ्यात त्यांचे हे दृश्य साठवू पाहिले. दोघेही व्हिडिओमध्ये एकमेकांना मिठी मारताना आणि प्रेमाने एकमेकांना गोंजारताना दिसून आले. घुबडांच्या जांभईपासून ते त्यांच्या रोमँटिक क्षणापर्यंत, या १५ सेकंदांच्या क्लिपमध्ये सर्वकाही कैद झाले आहे. लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला की त्यांनी लगेच त्याला शेअर करायला सुरुवात केली आणि हेच कारण आहे की कमी वेळात हा व्हिडिओ व्हायरल झाला.
पाहा व्हिडीओ
वन्यजीव छायाचित्रकार आरझूने हा व्हिडिओ तिच्या @aarzoo_khurana या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ अपलोड होताच तो इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला.फक्त एका दिवसात, याला १०० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि ६.२ दशलक्षाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. लोक कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओचे कौतुक करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “जेव्हा तो जांभई देतो, तेव्हा व्हिडिओ शिखरावर पोहोचतो.”तर दुसऱ्याने लिहिले, “पहिल्यांदाच मला घुबड इतके गोंडस वाटले.” एका युजरने लिहिले आहे, “घुबडांमध्येही प्रेम असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी आतापर्यंत पाहिलेली सर्वात गोड गोष्ट” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूप आवडले! प्रेम ही सर्व प्राण्यांसाठी सामान्य असलेली एकमेव सामान्य भाषा आहे”.
