Two People Entered The Metro Carrying Sofa: आजकाल सोशल मीडियावर मेट्रोमधील अनेक व्हिडीओ समोर येत असतात. कधी कोणी मेट्रोमध्ये नाचताना दिसते तर कोणी उड्या मारताना. कोणी फॅशन शो करताना तर कोणी भांडण करताना दिसते. दरम्यान सोशल मीडियावर आता मेट्रोमधील एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोन व्यक्ती चक्क सोफा घेऊ मेट्रोमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ mancelnyc नावाच्या अकांउटवरून पोस्ट केला आहे जो पाहिल्यानंतर लोक हैरान झाले आहेत आणि काहीजणांना हसू आवरेना झाले आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला पाहू शकता की कशा प्रकारे दोन व्यक्ती मेट्रो स्टेशनवर सोफा ठेवून उभे आहेत आणि मग जसशी मेट्रो येते तसे ते वेळ वाया न घालवता, सोफा उचलतात आण आत घेऊन जातात. पुढच्याक्षणी व्हिडीओमध्ये हे दोन तरुण पायऱ्यांवरून सोफा उचलून घेऊन जाताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून लोक मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण हा व्हिडीओ भारतातील नाही. हा व्हिडीओ न्युयॉर्क शहराती असल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा – जोडप्याने रेस्टॉरंटमध्ये दिली लग्नाची मोठी रिसेप्शन पार्टी! लाखों रुपयांचे बिल न भरताच नवरा-नवरीने काढला पळ

हेही वाचा – जिवंत माशांसह जलपरीने फॅशन शोमध्ये केला रॅम्प वॉक; व्हायरल व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी, उर्फी जावेद म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२२ सप्टेंबर रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ६.९ मिलियनपेक्षा जास्तवेळा पाहिले जात आहे तर सर्वात १ लाख १५ हजारपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. एकाने लिहिले की,”हे काम त्यांनी मध्यरात्री करायला पाहिजे होते, कारण त्यावेळी ट्रेन रिकामी असते.”दुसऱ्याने लिहिले की, “गेल्या ३५ वर्षांपासून मी न्युयॉर्कमध्ये राहत आहे पण मी असे दृश्य कधीही पाहिले नाही. विश्वास ठेवा हे दृश्य न्युयॉर्कमधीलच आहे.”