Viral Video : सोशल मीडियावर चिमुकल्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येतं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन बहिणी भांडताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून कदाचित तुम्हाला तुमचे बालपण आठवू शकते.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दो बहिणी वडिलांच्या मांडीवर बसलेल्या आहेत. त्या दोघीपैकी मोठी बहिण वडिलांना मिठी मारत रडताना दिसत आहे तर लहान बहिण सॉरी म्हणताना दिसत आहे.
या व्हिडीओ तुम्हाला दिसेल की जेव्हा लहान बहिण सॉरी म्हणते तेव्हा मोठी बहिण रडताना म्हणते, “मला तुझं सॉरी नको” तेव्हा वडील मध्यस्थी करतात. लहान चिमुकली म्हणते, “मी सॉरी म्हणाली आता कितीदा म्हणू?” तेव्हा वडील म्हणतात, “ताई रडत आहे. तिला मनवण्याचा प्रयत्न कर.” तेव्हा चिमुकली म्हणते, “काय करू?” तेव्हा वडिलांच्या सांगण्याप्रमाणे चिमुकली मोठ्या बहिणीला म्हणते, “सॉरी ताई.. आता पुन्हा असं करणार नाही..” हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कदाचित तुमच्या बहिण किंवा भावाची आठवण येऊ शकते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Optical Illusions : तुम्हाला फोटोमध्ये झाडावर हिरवी पाने दिसतात का? पण ही पाने नाहीत, एकदा क्लिक करून पाहा

viralclipz.z या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दोन बहिणीमधील गोंडस भांडण” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी वारंवार हा व्हिडीओ पाहत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “वडील खूप नशीबवान आहे. त्यांना अशा दोन गोंडस मुली आहेत.” काही युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.