Prasika UIC Video: “नमस्कार मंडळी, या जेवायला” असं म्हणत महाराष्ट्रातील घरोघरी पोहचलेल्या प्रसिकाची सोशल मीडियावर चांगलीच क्रेज आहे. प्रसिका या जोडीने इंस्टाग्राम, युट्युब, ट्विटर व फेसबुक अशा सगळ्याच प्लॅटफॉर्मवर लाखो चाहते कमावले आहेत. UIC म्हणजेच युअर इंडियन कन्झ्युमर या चॅनेलपासून प्रसाद व दीपिका वेदपाठक या जोडीने सोशल मीडियावर एंट्री केली होती. ग्राहक हक्कांविषयी जागरूकता तयार करण्यासाठी सुरु केलेले हे चॅनेल आज १२ लाखाहून अधिक सबस्क्राइबर्ससह मराठी युट्युब क्षेत्राचं महत्त्वाचं अंग ठरलं आहे. राजकारणापासून ते सामाजिक प्रश्नांपर्यंत अनेक विषयांवर प्रसाद व दीपिका नेहमीच परखडपणे आपली मतं मांडत असतात.
दुसरीकडे, याच जोडीचा भावनिक पैलू दाखवणारा प्रयोग म्हणजेच ‘प्रसिका’ (प्रसाद +दीपिका) सुद्धा प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत ठरला आहे. भारताच्याच नव्हे तर जगभरातील विविध प्रकारच्या जेवणाला घरगुती पद्धतीने बनवून सादर करत प्रसिकाने अनेक खवय्यांची साथ मिळवली. नवरात्रीत नऊ रंगांचे जेवण बनवणारी कदाचित ही पहिलीच जोडी असावी. युट्युबच्या क्षेत्रात करिअर बनवू पाहणाऱ्या किंवा सोशल मीडिया क्रिएटर म्हणून काम करणाऱ्या प्रत्येकाला मदत होईल असे काही खास फंडे प्रसिकाने लोकसत्ताच्या ‘इन्फ्लुएन्सरच्या जगात’ या सिरीजमध्ये सांगितले आहेत. याशिवाय तुम्हाला ‘प्रसिका’ या पॉवर कपलची लव्ह स्टोरी पहिल्यादाच ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे खालील व्हिडीओ पाहायला विसरू नका.
प्रसिकासह गप्पांचा भाग एक आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच भाग दोन मध्ये प्रसाद व दीपिकासह आपण वेगवेगळे धम्माल खेळ खेळणार आहोत. तसेच राजकारण, चाईल्ड फ्री राहण्याचा निर्णय, ट्रोलर्सच्या कमेंट्स या सगळ्यावर आपण दोघांचीही मतं जाणून घेणार आहोत. हे सर्व पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका.