Viral Video : उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. उखाणा म्हणजे लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे होय. कोणताही शुभ कार्यक्रम असो किंवा लग्नसोहळा आवर्जून उखाणा घेतला जातो. नवीन जोडपे अत्यंत उत्साहाने जोडीदाराचे नाव घेतात. काही उखाणे खूप मजेशीर असतात तर काही उखाणे थक्क करणारे असतात. काही उखाणे ऐकून पोट धरून हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क नवरदेव भन्नाट उखाणा घेत आहे. उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. (ukhana video a groom said funny ukhana on maharastrian politics)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक नवविवाहित जोडपे दिसून येईल. व्हिडीओमध्ये नवरदेव आणि नवरी जेवण करताना दिसत आहे. तेव्हा नवरदेव उखाणा घेतो आणि सर्वजण मजेशीरपणे ऐकताना दिसतात.
नवरदेव म्हणतो, “विनोदी उखाणे आहेत. महाराष्ट्रीयन राजकारणावर प्रेरणादायी उखाणे आहेत. पहिला उखाणा असा आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन, देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन; आता मी माझ्यासोबत प्राजक्ताला कॅनेडाला नेईन” नवरदेवाचा उखाणा ऐकून नवरीसह सर्वजण हसताना दिसतात. व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जेव्हा नवरदे कॅनेडाचा असतो आणि तरी त्याला भारतीय राजकारणाविषयी त्याला माहिती असते” godzee_photography या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्या लोकांना राजकारणात आवड आहे, त्यांना हा उखाणा आवडू शकतो.

हेही वाचा : बाप-लेकीच्या आयुष्यातला अनमोल क्षण; बाबांनी दिलेलं गिफ्ट पाहून चिमुरडी झाली खूश, एक्स्प्रेशनची होतेय चर्चा; VIDEO तुफान व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : असले मित्र नको रे बाबा! नवरदेवाच्या मित्रांनी लग्न विधी सुरू असताना गुरुजींच्या डोक्यात घातली पिशवी अन् पुढे जे घडलं… VIDEO पाहून व्यक्त कराल संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा मराठमोळा नवरदेव कॅनेडामध्ये राहत असला तरी त्याचे महाराष्ट्राविषयी प्रेम दिसून येते. तो मराठीत उखाणे म्हणताना दिसतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याची ऋची दिसतेय.
नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर आला आणि देशात एनडीएची सरकार स्थापन झाली. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. रविवारी पंतप्रधान मोदींसह ७१ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सध्या देशात सगळीकडे आंनदोत्सव साजरा करताना दिसत आहे.सोशल मीडियावर या संबंधित व्हिडीओ, फोटो, मीम्स, इत्यादी व्हायरल होताना दिसत आहे.