Viral video: शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी पक्ष देखील फुटला आहे. यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला होता. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाले आहेत. अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी पक्षावर दावा करत राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह आपल्या गटाकडे घेतलं. तर, शरद पवार यांना सु्प्रिम कोर्टानं नवं नाव आणि चिन्ह दिलं. त्यानुसार शरद पवार गटाचं नवं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे तर चिन्ह तुतारी आहे. दरम्यान या सगळ्यात आमदारांबरोबरच कार्यकर्तेही दोन्ही गटात विभागले गेले. यावेळी शरद पवारांच्या कट्टर समर्थकानं आपल्या लग्नात एक भन्नाट उखाणा घेतलाय. हा उखाणा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरदेव आणि नवरी मांडवात बसले आहे. यावेळी आजूबाजूला अनेक मंडळी जमलेली आहेत. यावेळी सगळे नवरदेवाला उखाणा घेण्यासाठी आग्रह करतात. अनेकदा आपण नवरीचे उखाणे एकतो मात्र फार कमी प्रमाणात नवरदेव उखाणा घेतात. मात्र या नवरदेवानं लांबलचक असा उखाणा घेतला आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की नक्की काय उखाणा घेतलाय. तर तुम्हीच ऐका…”घड्याळ आमचे चोरुन नेले साथ आम्ही नाही सोडणार नाही, शीतलचे नाव घेतो विजयाची तुतारी वाजवल्याशिवाय आम्ही थांबवणार नाही. महाराष्ट्राचा बुलंद आवज शरद पवार शरद पवार.” असा उखाणा या नवरदेवानं घेतला आहे.

“महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार, शरद पवार!!! आम्ही पवार साहेबांना सोबत, शेवटपर्यंत पवार साहेबांना सोबत मी पवार साहेबांना सोबत स्वाभिमानाची तुतारी” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मृत्यू जवळ आला पण चमत्कार झाला; दैव बलवत्तर म्हणून ‘ती’ अशी बचावली, पाहा थरारक VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

pradip_dere3191 नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडीओला ८० हजारांच्या वर लाइक्स गेले आहेत तर लाखोंमध्ये या व्हिडीओला व्ह्यूज गेले आहे. तर अनेकजण यावर कमेंट करत आहेत. एका युजरने यावर कमेंट केली आहे की,  “पवार साहेबच”. तर दुसऱ्या एकानं कमेंट केली आहे की, “जिंकणार तर शरद पवारच.”