Bizarre Van Crash Video: आजच्या सोशल मीडियाच्या युगात दररोज काही ना काही भन्नाट व्हिडीओ समोर येत असतात. पण काही व्हिडीओ असे असतात, जे पाहून क्षणभरासाठी डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आणि लोकांच्या प्रतिक्रिया पाहून लक्षात येतंय की, “असंच काहीतरी आजवर पाहिलं नव्हतं.”
कधी कधी असं काही तुमच्या डोळ्यांसमोर घडतं की, क्षणभर सगळं खरंच होतंय का हेच समजेनासं होतं. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतोय, जो तुम्ही पाहिलात तर तुमचाही विश्वास बसणार नाही. एका व्हॅनचा भीषण अपघात. व्हॅन रस्त्याच्या कडेला आपटते, उलटते, पण अचानक काही सेकंदात चमत्कार घडतो. व्हॅन आपोआप सरळ होते आणि ड्रायव्हर…? तो थेट गाडी घेऊन पुढे निघून जातो. नेमकं काय घडलं? हा खरंच चमत्कार होता की एडिटेड क्लिप? वाचा आणि पाहा हा थरारक व्हिडीओ…” आणि पाहून तुम्हीही म्हणाल खरंच असं होऊ शकतं का?
नेमकं घडलं काय?
व्हिडीओमध्ये दिसतं की एक पांढरी व्हॅन रस्त्यावर एका वळणावर वळते आणि अचानक नियंत्रण सुटल्यासारखी ती थेट रस्त्याच्या कडेला आदळते. हे इतकेच नाही तर ती व्हॅन डावीकडे पडते आणि काही मीटर अंतरापर्यंत घसटत पुढे जाते.
पण, खरी चमत्कारिक गोष्ट त्यानंतर घडते, व्हॅन जेव्हा स्थिर होते, तेव्हा ती आपोआप पुन्हा सरळ उभी राहते आणि इतकं घडल्यानंतरही ड्रायव्हर एक सेकंदही न थांबता, व्हॅन पुढे चालवत निघून जातो. जणू काही घडलंच नाही. दरम्यान, त्या व्हॅनमधून काहीतरी तुटून रस्त्यावर पडलेलंही दिसतं, पण ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर त्याची तसूभरही चिंता नाही.
नेटिझन्सनी काय म्हटलं?
हा धक्कादायक व्हिडीओ @virjust18 या X (पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं – “‘कोणीही काहीही पाहिले नाही!” या व्हिडीओला आतापर्यंत ६.८८ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले असून, लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलं, “शास्त्रांमध्ये यालाच जादू की झप्पी म्हणतात”, तर दुसऱ्याने म्हटलं, “टेंपोमधून काहीतरी पडलं… पण ड्रायव्हर कूल आहे!” काही जण तर याला AI जनरेटेड व्हिडीओ असल्याचा संशयही घेत आहेत.
येथे पाहा विचित्र आणि आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ
हटके, विचित्र आणि आश्चर्यचकित करणारा असा हा व्हिडीओ तुम्हीही पाहिलाच पाहिजे.