सध्या देशभरातील तरुणाईमध्ये आयपीएलची क्रेझ दिसून येत आहे. आपल्या देशातील लोकांना आयपीएलचं वेड किती आहे हे सांगण्याची गरज नाही. शिवाय अनेक क्रिकेटप्रेमी आयपीएलचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जातात. शिवाय स्टेडियममध्ये मॅच पाहायला जाणारे क्रिकेट चाहते आपल्या आवडत्या टीमला समर्थन देण्यासाठी हातात वेगवेगळे पोस्टर्स घेऊन जात असतात. सध्या अशाच एका तरुणाने स्टेडियममध्ये नेलेल्या पोस्टरची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हो कारण लखनऊमध्ये सुरू असलेल्या मॅचदरम्यान स्टेडियममधील एका तरुणाच्या हातातील पोस्टर पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. कारण या तरुणाने आपल्या हातातील पोस्टरद्वारे मुलीच्या पालकांना अनोखं आवाहन केल्याचं पाहायला मिळत आहे.

हातात पोस्टर घेऊन तरुणाचे लोकांना आवाहन –

स्टेडियममधील व्हायरल होत असेल्या व्हिडीओमध्ये, एक तरुण क्रिकेटचा सामना सुरु असताना स्टेडियमच्या मध्यभागी आपल्या सीटवर उभा असल्याचं दिसत आहे. या तरुणाच्या हातातील पोस्टरवर मोठ्या अक्षरात लिहिले आहे, “लग्नासाठी सरकारी नवरा शोधणे बंद करा, बेरोजगारी.” या तरुणाने केलेले अनोखे कॅमेऱ्यात कैद झाले आणि तो स्क्रीनवर झळकला. त्यामुळे त्याच्या या पोस्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर त्याने मुलीच्या पालकांना तरुणाने केलेलं आवाहन पाहून अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत.

हेही पाहा- नागिन डान्स करणाऱ्या तरुणाने घेतला पोलिसाच्या पायाचा चावा; व्हायरल Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

पोस्टरच्या समर्थनार्थ नेटकरी –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तरुणाच्या हातातील पोस्टरचा व्हिडीओ lucknowi_nazaare नावाच्या इंस्टाग्रामवर पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण या व्हिडीओला आतापर्यंत ७ लाखाहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर या मुलांने पोस्टरद्वारे केलेलं आवाहन पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, भावाला पूर्ण पाठिंबा द्या, तर दुसर्‍या एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे, “आताची तरूणाई आपले मुद्दे थेट स्टेडियममध्ये घेऊन जात आहे.” तर एका नेटकऱ्याने या तरुणाच्या पोस्टरवरील मुद्दा ही राष्ट्रीय समस्या असल्याचे म्हटले आहे.