Circus Funny Video Viral : तुमच्यापैकी अनेकांनी आयुष्यात एकदा तरी सर्कस पाहिली असेल. त्यात जवळपास सगळ्यांनी बालपणी सर्कस पाहण्याचा अनुभव घेतला असेल. जिथे कलाकार अनेक चित्तथरारक कसरती करताना दिसतात. या कसरती पाहतानाही काळजात धडकी भरते. दरम्यान, सर्कशीतील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला भीती नाही, तर हसू येईल. कारण- यात सर्कस सुरू असताना एका कलाकाराबरोबर अशी काही घटना घडते की, पाहूनच सगळे हसू लागतात. सर्कशीतील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला बॉलीवूडच्या फिर हेरा फेरी या चित्रपटातील एक सीनदेखील आठवेल. जाणून घेऊन नेमकं काय घडलं ते…

तुम्ही ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ हे चित्रपट पाहिले असतील. त्यातील ‘फिर हेरा फेरी’ चित्रपटात शेवटी एक सर्कस सीन आहे, ज्यामध्ये हवेत स्टंटबाजी करताना बाबू भैयाचा पायजमा खाली येतो, तो मजेशीर सीन तुम्हाला आठवतोय का? या व्हायरल व्हिडीओमध्येही असेच काहीसे घडले. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक कलाकार हवेत चित्तथरारक स्टंट करीत एका टोकावरून दुसऱ्या टोकाला जातो, जिथे एक दुसरा कलाकार उलटा लटकत आहे आणि त्याला या पहिल्या कलाकाराचे पाय धरायचे असतात; पण पायांऐवजी तो त्याचा पायजमा पकडतो आणि त्यामुळे पायांऐवजी त्याचा पायजमा त्याच्या हातांत येतो. पण, पाय हातात न आल्याने तो कलाकार पुन्हा दोरीच्या साह्याने मागे जातो तेव्हा त्याच्या लक्षात येते की, आपला पायजमा गायब आहे. ते पाहून तो गोंधळतो आणि पुढच्याच क्षणी खाली उतरून सरळ बाहेर पळत सुटतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा हास्यास्पद व्हिडीओ @HasnaZaruriHai नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘गलती से मिस्टेक हो गया’. दरम्यान, हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला, ज्यावर लोकांनीही हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.