Viral video: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पावसानं हाहाकार माजवला असून दुसरीकडे कलियुगात साक्षात कृष्ण-वासुदेवाचे दर्शन झाले आहे. हा प्रसंग पाहून तुम्हीही भावूक व्हाल. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे आणि पूर आला आहे. याच दरम्यान एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एक वडील आपल्या लहान मुलाला वासुदेवासारखं हातात घेऊन पुराच्या पाण्यातून सुरक्षित ठिकाणी जाताना दिसत आहेत.
अलीकडच्या कलियुगात माणसातील माणूसकी हरवत चालली आहे. येथे कोणालाही कोणाची पर्वा नाही. आपले आई-वडिलांशिवाय कोणीही आपली काळजी करत नाही. आई-वडिल आपल्या मुलांसाठी जगाशा लढायला तयार असतात. सध्या असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कलियुगातील वासुदेवाचे दर्शन झाले आहे. एक वडिल त्यांच्या लहान बाळाला डोक्यावरून घेऊन पाणी साचलेला रस्ता ओलांडताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या घटनेतून उत्तर प्रदेशातील अनेक भागात पावसाने कसा कहर केला आहे हे दिसून येते. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. गंगा आणि यमुना नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने हा पूर आला आहे. पुरामुळे रहिवाशांना पाणी साचलेल्या रस्त्यांवरून सुरक्षित ठिकाणी जावे लागले आहे.
एका व्हिडिओमध्ये एक कुटुंब पूरग्रस्त परिसरातून एका नवजात बाळाला आणि त्याच्या आईला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे. त्या क्षणी कोणतीही अधिकृत मदत उपलब्ध नसल्यामुळे, वडील बाळाला खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहेत तर कुटुंबातील दुसरा सदस्य आईला पाठीवर घेऊन जात आहे. हळूहळू आणि काळजीपूर्वक, ते कंबरेपर्यंतच्या पाण्यातून सुरक्षित ठिकाणी पोहोचले.व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या दृश्याने त्यांना भगवान कृष्णाच्या जन्माची गोष्ट आठवली, जेव्हा वासुदेवांनी यमुना नदी ओलांडली आणि कृष्णाचा जीव वाचवला होता असं म्हटलं.
पाहा व्हिडीओ
प्रयागराजमध्ये पूरस्थिती गंभीर आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत नद्यांची पाण्याची पातळी ८४.७३४ मीटर ओलांडली होती, जी धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त होती. २४ हून अधिक परिसर पाण्याखाली गेले आहेत आणि हजारो घरे पाण्याखाली गेली आहेत. सुमारे ३,००० लोक विस्थापित झाले आहेत आणि ते आता जिल्हा प्रशासनाने उभारलेल्या मदत छावण्यांमध्ये राहत आहेत.