सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील SDM ज्योती मौर्य यांची आणि त्याची पतीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. शिवाय ज्योती यांच्या कृतीमुळे अनेक पती आपल्या पत्नीला लग्नानंतर शिक्षणापासून दूर ठेवत असल्याच्या अनेक घटनादेखील समोर येत आहेत. तर ज्यातीने पती-पत्नीच्या नात्यामधील विश्वासार्हता गमावल्याचा आरोप पती आलोक याने केला आहे.
शिवाय मोठ्या पदावर गेल्यानंतर ज्योतीने आपल्याला धोका दिल्याचंही आलोकने म्हटलं आहे. आलोकच्या आरोपानंतरसोशल मीडियावर ज्योती यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं आहे. शिवाय नवऱ्याने शिकवलं आणि नोटकरी ज्योती यांनी नवऱ्याला धोका दिल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. या सर्व आरोपांवर आणि ट्रोलिंगवर ज्योती यांनी अखेर भाष्य केलं आहे.
काही नवऱ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या पत्नींचा अभ्यास बंद केल्याच्या आरोपानंतर ज्योती मौर्य यांनी आजतकशी बोलताना आपल्या नवऱ्याला आणि नेटकऱ्यांना उत्तर दिलं आहे. ज्योती यांनी सांगितलं की, सध्या सुरु असलेला वाद माझी वैयक्तिक बाब असून मला तो सार्वजनिक किंवा सोशल मीडियावर घेऊन जायचा नाही. मी कायदेशीर मार्गाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. शिवाय हे प्रकरण व्हायरल व्हायच्या आधीपासून ते कोर्टात असल्याचंही ज्योती यांनी सांगितलं.
शिवाय ज्योती यांच्या प्रकरणामुळे अनेक महिलांना शिक्षण बंद करावं लागत आहे, या प्रश्नाचं उत्तर देताना ज्योती म्हणाल्या, “मी ज्या पदावर आहे तिथून मी महिलांसाठी काम करते, महिलांना शिक्षण घेण्यापासून कोणीही रोखू नका, शिक्षण घेणं हा त्याचा घटनात्मक अधिकार आहे.”
यावेळी त्यांना आलोकने शिक्षणासाठी खूप मदत केली, ती अधिकारी बनवण्यामागे आलोकचा खूप मोठा वाटा आहे, अशा सततच्या बातम्यांवर ज्योती यांनी पतीला आणि नेटकऱ्यांना टोमणा मारला. त्या म्हणाल्या, “तुम्हाला माहिती आहे, आलोकने मला लहानपणापासूनच वाढवलं, मी एलकेजीमध्ये असताना माझे लग्न झाले आहे.” शिक्षणासाठी पतीने मदत केल्याच्या प्रश्नावर ती म्हणाली की, नवरा बायकोच्या नात्यात दोघेही एकमेकांना मदत करतात हे उघड आहे. पण मदत केल्याचा अर्थ असा नाही की, एखादी व्यक्ती मोठ्या पदावर गेल्यावर तुम्ही त्याला सतत टोमणे मारत राहणार किंवा त्याचा रोज मानसिक छळ करणार का? असा प्रश्न ज्योती यांनी विचारला. दरम्यान पतीबरोबरचे नाते तुटण्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, मी वेगळं होण्यासाठी कायदेशीर मार्ग निवडला होता, पण आलोकने हे प्रकरण सोशल मीडियावर आणून आमचे १२ वर्षांचे नाते आणखी बिघडवले.