scorecardresearch

VIRAL VIDEO : गाडी फुल स्पीडमध्ये असताना हरणाने इतक्या उंच उडी मारत रस्ता ओलांडला

हरणाला उडी मारताना तर आपण नेहमी पाहतो, असं तुम्हाला वाटेल. पण या हरणाची उडी तशी खासच आहे.

VIRAL VIDEO : गाडी फुल स्पीडमध्ये असताना हरणाने इतक्या उंच उडी मारत रस्ता ओलांडला
(Photo: Twitter/ MspSouthwestMI)

Highway Shocking Video : हरणाला पळताना तुम्ही पाहिलं असेल तसा हरणांचा पळण्याचा वेग हा तसा कमी नसतो. सध्या अशाच एका हरणाच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्याच्या उडीची चांगलीच चर्चा होते आहे. आता हरणाने उडी मारणं यात काय विशेष आहे. हरणाला उडी मारताना तर आपण नेहमी पाहतो, असं तुम्हाला वाटेल. पण या हरणाची उडी तशी खासच आहे. कारण त्याची उडी म्हणजे फक्त उडी नाही तर जीवाच्या अकांताने झेप घेताना दिसलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमधला थरार पाहताना अंगावर काटा उभा राहतो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीच्या गडद अंधारात महामार्गावरून गाड्या फुल स्पीडमध्ये धावताना दिसत आहे. एक कार फुल स्पीडमध्ये जात असताना अचानक समोरून एक हरीण उंच उडी मारून रस्ता ओलांडताना दिसून आला. यादरम्यान हरणाची ही उंच उडी थोडी सुद्धा मागे पुढे झाली असती तर कदाचित हे हरीण कारला धडकले असते. पण सुदैवाने या हरणाने मोठ्या हुशारीने उडी घेत कार पुढे येण्याआधीच उडी घेऊन रस्ता ओलांडला. त्यामुळे यात त्याचा जीव वाचला. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या वेळेत एक नव्हे तर तीन-तीन हरीण रस्ता ओलांडतात.

आणखी वाचा : आकाशातून इंद्रधनुष्य कसं दिसतं बघायचंय? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

हा धक्कादायक व्हिडीओ समोरून येणाऱ्या कारमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पहिले हरीण सहज रस्ता ओलांडतं, दुसरे हरीण उडी मारतं आणि तिसरे हरीण सुद्धा रस्ता ओलांडतं. हा १८ सेकंदांचा व्हिडीओ पाहताना अंगावर काटा येतो. हा व्हिडीओ अमेरिकेतील मिशिगन राज्याच्या फिफ्थ डिस्ट्रिक्ट पोलिसांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

आणखी वाचा : ऑस्ट्रेलियात १४ व्हेल माशांचा गूढ मृत्यू? ज्यांची उलटी ३० लाखात विकली जाते, कारण जाणून घ्या

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL : पती, पत्नी और वो! एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात होता नवरा, मग बायकोने दोघांचं लग्न लावलं आणि आता…

हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. हा व्हिडीओ २२ सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आला होता. अवघ्या तीन दिवसात हा व्हिडीओ व्हायरल झालाय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या