Kedarnath Temple Mobile Ban : पवित्र चार धामांमधील सर्वात लोकप्रिय असलेल्या केदारनाथ मंदिरामध्ये आता मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. येथे येणाऱ्या भाविकांना आता मंदिर परिसरात फोन वापरता येणार नाही. काही दिवसापूर्वीच मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात रिल्स आणि व्हिडीओ बनवण्यास बंदी घातली होती. त्यानंतर आता मंदिर प्रशासनाने मोबाईल फोन संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केदारनाथ मंदिरात भाविकांना मोबाईल फोन घेऊन जाता येणार नाही. तसेच यापुढे भाविकांना मंदिर परिसरात फोटो काढता येणार नाहीत किंवा व्हिडिओ बनवता येणार नाहीत. बद्री-केदारनाथ मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे.

केदारनाथ मंदिरामध्ये मोबाईल बंदी

केदारनाथ मंदिर समितीने मंदिर परिसरात फोन नेण्यावर बंदी घातली आहे. एवढंच नाही तर भाविकांना आता मंदिरात फोटो, रिल्स किंवा व्हिडीओही काढता येणार नाहीत. यासोबतच मंदिर समितीने कपडे घालण्याबाबत नवीन नियम लागू केले आहेत. काही दिवसांपूर्वा केदारनाथ मंदिर परिसरातील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते, या व्हायरल व्हिडीओमुळे पावित्र्य भंग करत भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने आता मोबाईल फोनला मनाई केली आहे.

हेही वाचा – VIDEO: ही तर खाकी वर्दीची गुर्मी! रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या लहानग्याला पोलिसांनी लाथेनं मारलं अन्

अलीकडेच विशाखा नावाची युट्युबर तिच्या प्रियकरासह भगवान केदारनाथच्या दर्शनाला आली होती. अचानक तिने प्रियकराला लग्नासाठी प्रपोज केले. मुलगा तिला लग्नासाठी हो म्हणाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तरुणीने सोशल मीडियावर अपलोड केला होता, जो व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंदिरात रील बनवण्याविरोधात आवाज उठू लागला. केदारनाथला सामान्य पर्यटन स्थळासारखे वागवले जात असल्याचे लोकांनी सांगितले. असे व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मंदिर समितीकडून करण्यात आली.

हेही वाचा – तरुणीला मांडीवर बसवून चालत्या बाईकवर कपलचा रोमान्स; Video व्हायरल होताच पोलिसांनी केली अशी अवस्था

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बद्रीनाथमध्ये लवकरच मोबाइलवर बंदी घालण्यात येणार

बीकेटीसीचे अध्यक्ष अजेंद्र अजय म्हणाले की, हे एक धार्मिक ठिकाण आहे, जिथे लोक मोठ्या श्रद्धेने येतात. भक्तांनी त्याचा आदर करावा. ते म्हणाले की बद्रीनाथ धाममधून अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही, परंतु तेथेही असे फलक लावले जातील.