लहान मुलांच्या तोंडी कोणतीही गोष्ट अतिशय छान, लडीवाळ वाटते. जगाच्या पाठीवरचे कोणतेही लहान मूल असो, त्याच्या बोलण्यात तितकाच गोडवा असतो. असाच एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक चिमुकली गाणं गाताना दिसते आहे. हे गाणं ती अतिशय सुंदरपणे गाते आहे. आता तिचं इतकं कौतुक का? तर परदेशी असूनही ती बॉलिवूडचे एक गाणे अतिशय सुरेल गाताना दिसते.

बॉलिवूडचं गाणं गाणारी ही चिमुकली उझबेकिस्तानची आहे. तिचं नाव आहे रोबिया. साधारण ३ ते ४ वर्षांच्या आसपास तिचं वय असल्याचं व्हिडिओवरुन वाटते. हिंदी दिनाच्या निमित्तानं हे गाणं व्हायरल झाले. विशेष म्हणजे हिंदी येत नसतानाही तिने ‘झुबी डूबी…’ हे गाणं अतिशय सुंदर गायलंय. काही वर्षांपूर्वी जोरदार गाजलेल्या ‘३ इडियट्स’ या चित्रपटातील हे गाणं असून, त्यामध्ये आमिर खान, करिना आणि बोमन इरानी आहेत. या लहानगीला गाण्याचे बोल नीट येत नसले, तरीही त्यामध्ये असणारा गोडवा ऐकणाऱ्याला नक्कीच भावतो. अनेकांनी तिच्या या गाण्याचं सोशल मीडियावर कौतुकही केलं आहे. हिरव्या रंगाचा फ्रॉक आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे जॅकेट घातलेली रोबिया अतिशय गोड दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उझबेकिस्तान आणि भारताच्या राजकीय संबंधांना २२ मार्च २०१७ रोजी २५ वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्ताने एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रूस्तम आणि रोबिया यांनी बॉलिवूडची अनेक गाणी गायली. मात्र हे गाणे प्रेक्षकांच्या आणि नेटिझन्सच्या विशेष पसंतीस पडले, असे म्हणता येईल.