Tomato Price Hike: सध्या टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो १०० ते १२० रुपयांच्या आसपास आहेत. टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळं सर्वसामान्यांची खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळं ग्राहकांनी टोमॅटो खरेदीकडे पाठ फिरवली आहे.अशातच टोमॅटो महागल्याचा फायदा बाकी विक्रेतेही घेत आहेत. वेगवेगळ्या स्किम आजमावत, टोमॅटोचा लोभ देऊन ते आपल्या वस्तू विकताना दिसत आहे. आत्तापर्यंत अनेक विक्रेत्यांचा भन्नाट जाहिराती सोशल मीडियावर समोर आल्या. आता यामध्ये भर पडली असून एका टॅटूच्या दुकानात टोमॅटोची ऑफर लावली असल्याचं पहायला मिळाली.
हे प्रकरण उत्तर प्रदेशातील वाराणसीतून समोर येत आहे. मग काय ही ऑफर ऐकून दुकानात महिलांती तुंबड गर्दी झाली. वारणसीतू येत असलेल्या घटनेनं अनेकजण थक्क झाले. दुकानदाराने टॅटू काढायला येणाऱ्या ग्राहकांना टोमॅटो मोफत दिलं जाईल अशी ऑफर ठेवली आहे. टोमॅटोची किंमत जास्त असल्यानं लोक त्याचा फायदाही घेत आहेत. विशेषत: महिला या ऑफरसाठी दुकानात पोहोचत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दुकानात पोहोचलेल्या काही महिलांनी सांगितले की, त्या संधीचा फायदा घेण्यासाठी येथे आल्या आहेत.
पाहा फोटो

हेही वाचा – तरुणीचं धाडस! सिंहाच्या बाजूला बसून एकाच ताटात जेवतेय तरुणी, VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
टोमॅटोच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर, अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मी ही ऑफर सुरु केली अशी प्रतिक्रिया टॅटू आर्टिस्टने दिली आहे. जोपर्यंत टोमॅटोचे भाव चढे राहतील तोपर्यंत ही ऑफर सुरू राहील असंही त्यांनी सांगितलं