Viral video: चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज चोरीच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. सोन्याचे दागिने, रोख रक्कम, वाहने इत्यादी चोरी होणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे.चोरी ची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. आता जवळपास प्रत्येक रेस्टॉरंट, हॉटेल, कॅफे आणि बाजारातील कोणतेही दुकान. त्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही सुविधा असलेले कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे काहीही झालं तरी त्यात सर्व प्रकार कैद होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका चोरानं हातसफाईनं चक्क महिलेच्या खिशातून आयफोन चोरला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

कसा लंपास केला आयफोन पाहा

चोराने सर्वांसमोर कशा पद्धतीने आयफोनची चोरी केली ते या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं आहे. या चोरानं नेमकं काय केलं ते व्हिडीओमध्येच पाहा. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, दोन महिला आणि एक पुरुष रस्त्यावर उभे आहेत आणि ते एकमेकांशी बोलण्यात व्यस्थ आहेत. यावेळी त्यातील एक महिला तिचा आयफोन हातात घेते पाहते आणि पुन्हा खिशात ठेवते. यावेळी या महिलेच्या सर्व हालचालींवर बाजूलाच उभा असलेला चोर बारीक लक्ष ठेवून आहे. तो चोरी करायला संधीच शोधत असतो तेवढ्यात तो अंदाज घेऊन महिलेच्या बाजूला जातो आणि हातसफाईनं तिच्या खिशातून मोबाईल अलगद काढून घेतो. आणि क्षणभरही तिथे न थांबता तिथून पसार होतो.

तरुणीनं केलं ट्विट

तरुणीने ट्विट करत प्रकरणाची माहिती दिली आहे, “ही संपूर्ण घटना २९ जानेवारी २०२४ ला घडली असून मी माझ्या आईवडिलांसोबत वाराणसी ट्रीपला गेली होती. तेव्हा तिथे स्ट्रीट फूड खात असताना अचानक एका चोराने माझ्या खिशातील मोबाईल चोरला. माझा मोबाईल नसल्याचे हे मला थोड्या वेळाने जाणवले. चार महिन्याआधीच मी आयपोन १३ घेतला होता. तो वाराणसी नाई सरक चौकातून चोरीला गेला. त्यानंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांत एफआयआर दाखल केली”.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: अशी सासू हवी ग बाई…सुनेच्या स्वागतासाठी केला भन्नाट डान्स; वऱ्हाडीही राहिले बघत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावरील एक्सवर @shehjarr_या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून, चोराची हुशारी पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.