Fans Outcry on Social Media as Famous Scooby-Doo Character Turns Out to be 'Gay'; See the reaction | Loksatta

Scooby-Doo चे प्रसिद्ध पात्र ‘समलैंगिक’ असल्याचे दाखवताच चाहत्यांचा सोशल मीडियावर जल्लोष; पाहा प्रतिक्रिया

गेल्या कित्येक वर्षांच्या तर्क-वितर्कानंतर अखेरीस सुप्रसिद्ध सिरीज ‘स्कुबी डुबी डू’मधील वेल्मा समलिंगी असल्याचं सिद्ध झालं आहे.

Scooby-Doo चे प्रसिद्ध पात्र ‘समलैंगिक’ असल्याचे दाखवताच चाहत्यांचा सोशल मीडियावर जल्लोष; पाहा प्रतिक्रिया
स्कुबी डूचे प्रसिद्ध पात्र 'Gay' असल्याचे दाखवताच चाहत्यांचा सोशल मीडियावर जल्लोष (Flickr)

गेल्या कित्येक वर्षांच्या तर्क-वितर्कानंतर अखेरीस सुप्रसिद्ध सिरीज ‘स्कुबी डुबी डू’मधील वेल्मा हे पात्र समलैंगिक असल्याचं सिद्ध झालं आहे. या सिरीजमधील “ट्रिक वर ट्रीट स्कुबी डू’ हा चित्रपट या आठवड्याच्या सुरुवातीला डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात वेल्माचे कोको डायब्लोवर क्रश असल्याचे दाखवले आहे. या चित्रपटात कोको डायब्लो ही खलनायकी पोशाख डिझायनर दाखवण्यात आली आहे.

या आठवड्यात रिलीज झालेल्या हॅलोवीन स्पेशल “ट्रिक ऑर ट्रीट स्कूबी-डू” मधील क्लिपनुसार वेल्मा जेव्हा पहिल्यांदा कोको डायब्लोला भेटते तेव्हा तिच्या चष्म्यावर धुके जमा झालेले आणि तिचे गाल लाल झालेले दाखवण्यात आले आहे. तर एका दृश्यात ती डॅफ्नेला विचारते, “ठीक आहे, मी कोणाची मस्करी करत आहे? मला ती खूप आवडते! मी काय करू? मी काय बोलू?”

‘स्कूबी डू’ मधील ही हौशी गुप्तहेरांची टोळी १९६९ पासून अनेक रहस्ये सोडवत आहे आणि अनेक पिढ्यांना आनंद देत आहे.

वेल्मा समलैंगिक असल्याची पुष्टी झाल्यानंतर गुगलनेही एक खास फिचर तयार केले आहे. या फीचरनुसार गुगलवर Velma संबंधित शब्द शोधल्यास स्क्रीनवर प्राईड फ्लॅग आणि कॉन्फेटी दिसतात. वेल्मा आपल्या भावना काबुल करत असल्याची ही क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. स्कूबी डू फ्रँचायझीच्या अनेक चाहत्यांनी यासंबंधी अनेक ट्विट केले आहेत. या फ्रँचायझीच्या चाहत्यांनी खूप आधीच वेल्मा समलैंगिक असल्याचा अंदाज लावला होता. मात्र या गोष्टीच्या पुष्टीनंतर ते अधिकच खुश झाले आहेत.

दरम्यान, ‘स्कुबी डुबी डू’च्या चाहत्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहूया.

२०२० मध्ये निर्माता टोनी सेर्व्होनने इंद्रधनुष्य-थीम असलेल्या प्राइड पार्श्वभूमीवर वेल्मा आणि आणखी एका स्त्री पात्राचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.

यावेळी त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहलेलं, “आम्ही दहा वर्षांपूर्वी आमचे हेतू स्पष्ट केले होते. आमच्या बर्‍याच चाहत्यांना ते समजले. ज्यांना अद्याप समजलेलं नाही त्यांना मी आणखी जवळून पाहण्याचा सल्ला देतो.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-10-2022 at 16:19 IST
Next Story
Baba Vanga: नवीन युगातील बाबा वेंगा बनली ‘ही’ १९ वर्षीय युवती; २०२२ मध्ये तिने केलेल्या ‘या’ भविष्यवाण्या ठरल्यात खऱ्या