Sugarcane juice vendor accident Viral Video: रोजीरोटी मिळवणं हे कुठल्याही सामान्य माणसासाठी सोपं नसतं. घर चालवण्यासाठी आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी अनेकांना जीवतोड मेहनत करावी लागते. पोटाची भूक भागविण्यासाठी सगळेच आपापल्या परीने मेहनत करत असतात. पोटाची भूक शमविण्यासाठी मनुष्य जीवापाड मेहनत करतो. वीतभर पोटासाठी दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी जनता राब राब राबते. याच प्रकारे पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक लोक आपला जीव धोक्यात टाकून काम करतात. अशाच मेहनतीचं वेदनांनी भरलेलं दृश्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका ऊस रसविक्रेत्याचा हृदय हेलावून टाकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

आजही लाखो कष्टकरी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांना रोजीरोटी मिळवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मेहनत करावी लागते. अशाच प्रकारचा एक हृदयद्रावक प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एक ऊस रसविक्रेता ज्यूस मशीनमध्ये अडकलेल्या हातामुळे जखमी झाला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऊसाचा रस काढणाऱ्या गाळ्यामध्ये त्या विक्रेत्याचं बोट अडकतं आणि तो वेदनांनी तो ओरडतोय. आसपास उभी असलेली गर्दी आणि पोलिसही त्याला मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. व्हिडीओमध्ये पुढे दिसतं की, पोलिस आणि काही नागरिक मिळून त्या विक्रेत्याचा हात मशीनमधून बाहेर काढतात. त्याचं बोट रक्तानं माखलेलं असतं आणि तो जोरजोरात विव्हळतोय. पोलिस त्याच्या जखमांवर कपडा बांधतात आणि त्याचं रक्त थांबविण्याचा प्रयत्न करतात. रक्ताच्या धारांमध्येही तो केवळ आपल्या कुटुंबाचा विचार करीत होता. “आता घर कसं चालेल?” ही काळजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.

हा व्हिडीओ ‘kseries2025panipat’ या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला असून, तो लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहून अनेक युजर्स भावनिक झाले असून, कमेंटमध्ये त्यांनी आपली सहवेदना व्यक्त केली आहे.

येथे पाहा व्हिडीओ

एका युजरने लिहिलं, “तो वेदनांनी नाही, तर हताशपणे रडतोय… कारण- त्याच्या मनात हेच आहे की, आता घर कसं चालेल?” दुसऱ्या युजरने लिहिलं, “गरिबी खूप काही शिकवते… आणि खूप काही हिसकावतेसुद्धा.” तर आणखी एका युजरने लिहिलं, “पप्पांसाठी एक लाईक तरी कराच.”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.