प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या देवावर अपार श्रद्धा असते. मग या श्रद्धेसाठी भक्त काहीही करु शकतात. कधी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तर कधी आणखी काही कारणाने विशिष्ट देवाची भक्ती करणारे आपल्याकडे पाहायला मिळतात. हिंदू धर्मात अनेक देवांना महत्त्व असले तरीही गणेशोत्सव हा सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. असाच गणपतीचा चाहता असलेल्या एकाने बाप्पाच्या एक-दोन नाही तर तब्बल दीडशे मूर्ती जमवल्या आहेत. नोएडा येथे राहणाऱ्या व्यंकटेश यांनी हा विक्रम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे कलेक्शन त्याने मागील २५ वर्षांपासून केले असून या काळात तो जिथे गेला तेथील विशेष मूर्ती त्याने आणली. असे केल्याने त्याच्याकडे गणपतीच्या लहान-मोठ्या अशा १५० मूर्ती जमल्या आहेत. यातील काही मूर्ती या अतिशय अनोख्या आहेत. एखादा बाप्पा लॅपटॉप चालवत आहेत तर दुसरा झोका घेताना दिसतो. आता इतक्या सगळ्या मूर्ती त्याने ठेवल्या कुठे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्याने या मूर्तींनी आपले सगळे घरच सजवून टाकले आहे.

व्यंकटेश पेशाने कॉर्पोरेट कन्सलटंट आहेत. आपल्या या मूर्ती जमविण्याच्या आवडीबद्दल ते म्हणतात, २५ वर्षापूर्वी जेव्हा मी दिल्लीतील मयूर विहार भागात राहत होतो तेव्हा मी रोज गणपतीच्या मंदिरात जात होतो. हळूहळू माझी देवावरील श्रद्धा वाढत गेली. मग मला ज्याठिकाणी छानशी गणपतीची मूर्ती दिसेल तिथे मी ती आवर्जून खरेदी करायचो. यातील ५० हून अधिक मूर्ती या १००० रुपयांहून अधिक किमतीच्या आहेत. या मूर्ती तामिळनाडू, मुंबई, जयपूर, बंगळुरु, राजस्थान, इंदौर येथून आणली आहे. यातील खास मूर्ती म्हणजे ९ प्रकारच्या डाळींपासून तयार करण्यात आलेली मूर्ती. तसेच १ इंचाची सर्वात लहान मूर्ती हे विशेष आकर्षण आहे.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venkatesh from noida collecting 150 ganpati idol from last 25 years
First published on: 14-09-2018 at 18:41 IST