Viral Video : मेहंदी हा साज श्रृंगारातील महत्त्वाचा घटक आहे.भारतीय विवाह सोहळ्यात नववधुला मेहंदी काढण्याची पद्धत आहे.याशिवाय लहान मुलींपासून वृद्ध महिलांपर्यंत सर्वांना हातावर मेहंदी काढायला आवडते. सोशल मीडियावर सुद्धा मेहंदी काढतानाचे व्हिडीओ किंवा मेहंदीचे फोटो व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप क्रिएटिव्ह असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक ते दहा आकड्यापासून सुंदर मेहंदी डिझाइन साकारली आहे.हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हातावर १ ते १० पर्यंत इंग्रजी आकडे काढलेले आहेत आणि आकड्यांपासून सुंदर डिझाइन साकारताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी इतकी सुंदर डिझाइन तयार होते की तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही की ही मेहंदी डिझाइन १ ते १० आकड्यांच्या मदतीने बनवलेली आहे. क्रिएटिव्ही पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हेही वाचा : निर्सगाची किमया! व्हिडीओमध्ये राधा कृष्ण दिसताहेत का? व्हायरल Video पाहा
sunithasmehndiart या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “आकड्यांपासून बनवलेली खूप सोपी मेहंदी डिझाइन ट्रिक”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय,”खूप छान” अनेक युजर्सना या मेहंदी डिझानची ट्रिक आवडली आहे.