Viral Video: ९८ वर्षीय राम सुरत यांना उत्तर प्रदेशच्या अयोध्या कारागृहातून पाच वर्षे तुरुंगवास भोगून सोडण्यात आले. या व्यक्तीला कलम ४५२, ३२३ आणि ३५२ आयपीसी अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. सुटका झाल्यानंतर तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला दिलेल्या भावुक निरोपाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.डीजी प्रिझन्स यूपी यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.

या व्हिडिओमध्ये अयोध्या कारागृहाचे जिल्हा अधीक्षक शशिकांत मिश्रा पुत्रवत राम सुरतला सांगतात की पोलीस तुम्हाला तुमच्या घरी सोडतील. एवढं म्हणून मिश्रा वृद्ध व्यक्तीला कारमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत.९८ वर्षीय श्री रामसूरत यांना त्यांच्या सुटकेच्या वेळी घ्यायला कोणीही आले नाही. म्हणूनच अयोध्याचे अधीक्षक जिल्हा कारागृह श्री शशिकांत मिश्रा पुत्रवत यांना त्यांच्या घरी सोडायला गेले आहेत असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार सुरत यांना ८ ऑगस्ट २०२२ लाच तुरुंगातून सोडण्यात येणार होते, परंतु २० मे २०२२ ला त्यांना कोविड-19 चे निदान झाले आणि त्यांना ९० दिवसांच्या पॅरोलवर पाठवण्यात आले होते.

हे ही वाचा << Video: आधी बाईकवर रोमान्स, आता राणु मंडल बनली नवरी; स्वतःच म्हणते, ये क्या हुआ, कैसे हुआ?

दरम्यान, या व्हिडिओला ट्विटरवर दोन हजाराहून अधिक व्ह्यूज व कमेंट्स मिळाल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “सुरत हे तुरंगातून निघून मंदिरात जाणार आहेत असे सांगितले आहे बहुधा ते मंदिराचे पुजारी असावेत. थरथरणारे हात आणि वय पाहता त्यांनी नेमका काय गुन्हा केला होता ज्यासाठी त्यांना एवढी शिक्षा देण्यात आली याविषयी नेटकऱ्यांना प्रश्न पडत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकांनी कमेंट करून इतकं वय असलेल्या व्यक्तीला तुरुंगात ठेवताना पोलिसांना काहीच वाटलं नाही का असाही प्रश्न केला आहे. दरम्यान यासंदर्भात कायद्यात विशेष तरतुदी आहेत का असेही प्रश्न केले जात आहेत.