Anand Mahindra Viral Video: आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. कधी भारतीयांच्या भन्नाट जुगाडाचे तर कधी महिंद्राच्या गाड्यांचे एका पेक्षा एक जबरदस्त पोस्ट महिंद्रा यांच्या अकाउंटवर पाहायला मिळतात. म्हणूंच आनंद महिंद्रा यांचे अकाउंट अनेकांच्या आवडीचे आहे. आता सुद्धा असाच एक कमाल मजेशीर व्हिडीओ महिंद्रांनी शेअर केला आहे. यात एका रेडिओ जॉकीने महिंद्रा XUV चे काही मजेशीर फीचर्स सांगितले आहेत. महिंद्रा या व्हायरल पोस्टने इतके खुश झाले आहेत की त्यांनी या आरजेला आपल्या नव्या गाडीच्या डिझाईनसाठी डिजाईन स्टुडिओमध्ये येण्याचे आमंत्रणच दिले आहे. नेमकी ही पोस्ट काय आहे हे पाहूया…

महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये @RJ_Purkhaa हिने एकापेक्षा एक फीचर्स सांगितले आहेत. जसे की, Resume हे फीचर वापरून तुम्ही तुमच्या नोकरीचा सीव्ही बनवून घेऊ शकता. क्रूजवर सुट्टीसाठी जायचे असेल तर Cruise हे फीचर वापरा. तुम्हाला एखाद्यासह सेटिंग लावायचे असेल तर Settings चे फीचर वापरू शकता, तुम्हाला सॉस हवा असेल तर, फोन घ्यायचा असेल तर गेला बाजार तुमच्या मुलांना आकडेमोड शिकवायची असेल तर तुम्ही महिंद्रा XUV चे सगळे फीचर्स एक एक करून वापरू शकता. अत्यंत मजेशीर पद्धतीने बनवलेला हा व्हिडीओ पाहून महिंद्राही खुश झाले आहेत.

Video: महिंद्रा XUV लावून देणार सेटिंग

हे ही वाचा<< टक्कल लपवण्यासाठी तरुणाचा जुगाड! ना विग, ना पावडर- गोळ्या, Video पाहून म्हणाल, “भावा पैसे वाचवलेस”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडीओ मुळात खूप व्हायरल झाला होता. महिंद्रा यांनी ट्वीटमध्ये लिहिल्यानुसार, हा व्हिडीओ अनेकांनी त्यांना पाठवला होता. आता महिंद्राच्या पोस्टवर सुद्धा जवळपास ७६ हजार व्ह्यूज आहेत. यावर अनेकांनी कमेंट करून या आरजेच्या क्रिएटिव्हिटीचे कौतुक केले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.