नॉर्वेजियन ग्रुप हा सोशल मीडियावरील अतिशय लोकप्रिय डान्स ग्रुप आहे. वेगवेगळ्या गाण्यांवरील त्यांचे डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात. कतरीना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा चित्रपट ‘बार बार देखो’मधील ‘काला चष्मा’ या गाण्यावरील त्यांचा डान्स खूपच व्हायरल झाला होता. यानंतर त्यांची लोकप्रियता वाढतच गेली. त्यांच्या डान्स स्टेप्स कॉपी करून अनेकजणांनी या गाण्यावर व्हिडीओ तयार केले होते. दरम्यान, त्यांचा एक नवा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये आपण बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांनाही पाहू शकतो.

अनिल कपूर हे बॉलिवूडचे एव्हरग्रीन कलाकार आहेत. ६५ वर्षे पूर्ण झालेल्या अनिल कपूर यांची एनर्जी एखाद्या तरुणालाही लाजवेल. नुकतंच त्यांनी नॉर्वेजियन ग्रुपसह त्यांचेच लोकप्रिय गाणे ‘एक लडकी को देखा तो…’ रिक्रिएट केले आहे. या व्हिडीओमध्येही कपूर यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे.

नेटकऱ्यांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे. नॉर्वेजियन ग्रुपच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत एक मिलिअनहून आधी व्ह्यूज आणि २ लाख ७८ हजारांहूनही अधिक लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये अनिल कपूर या ग्रुपला डान्स शिकवत असल्याचे दिसते. ग्रुपमधील एक व्यक्ती मुलीची नक्कल करत मुलांच्या जवळून जातो. मुलं त्याच्याकडे स्लो मोशनमध्ये पाहतात. यानंतर कॅमेरा अनिल कपूर यांच्याकडे वळतो. अनिल कपूर तिथे असलेल्या एका कट्ट्यावर बसून मुलांना सूचना देत आहेत.

व्हिडीओच्या शेवटी अनिल कपूर विरुद्ध दिशेने धावत जातात. यानंतर इतर मुलेही त्यांच्या मागून जातात. यावेळी अनिल कपूर यांनी हवाईयन शर्ट घातलेले दिसते. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर सुंदर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटलंय, “अनिल कपूर GOAT आहेत. (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम)” तर दुसऱ्याने म्हटलंय, “ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीनवरील सर्वात उत्कृष्ट कलाकारांपैकी एक.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या महिन्यात, या डान्स ग्रुपने टाइम्स स्क्वेअर, न्यूयॉर्क येथे केलेल्या डान्सने सर्वांनाच थक्क केले. यावेळीही त्यांनी ‘काला चष्मा’वर डान्स केला. त्यांच्या व्हिडीओला केवळ ३ दिवसांच्या आत इन्स्टाग्रामवर २ दशलक्षाहून अधिक व्ह्यू मिळाले.