Asaduddin Owaisi Shiv Tandav Stotra Video: लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा उद्या म्हणजेच १६ मार्च २०२४ ला दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी विविध पक्षांकडून प्रचाराची जोरदार सुरवात झाली आहे. प्रचारादरम्यान अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत पण त्या सगळ्यांमध्ये तथ्य आहेच असे नाही. जसे की अलीकडेच, हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला गेला होता. व्हिडिओमध्ये ते एका सार्वजनिक सभेत शिव तांडव स्तोत्र गाताना दिसत आहे. तपासादरम्यान आम्हाला या व्हिडीओचे भलतेच सत्य लक्षात आले. हा एकूण प्रकार काय हे पाहूया.

काय होत आहे व्हायरल?

X यूजर MalathiReddy 2.0 ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर युजर्सही पोस्ट शेअर करत आहेत.

तपास:

कीवर्ड शोध वापरून आम्ही असदुद्दीन ओवेसी यांनी खरोखर शिव तांडव स्तोत्र गायले आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला त्याबद्दल कोणतेही वृत्त आढळले नाही. त्यानंतर आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड केला आणि त्यातून विविध कीफ्रेम्स मिळाल्या. आम्ही एकामागून एक कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले. रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्हाला २७ ऑक्टोबर २०२२ रोजी AIMIM च्या YouTube चॅनलवर अपलोड केलेला व्हिडिओ सापडला.

या सभेत असदुद्दीन ओवेसी यांनी सध्या शेअर होणाऱ्या व्हिडिओप्रमाणेच कपडे परिधान केले होते. आम्हाला असेही आढळले की हा मूळ व्हिडिओ चांगल्या गुणवत्तेचा होता आणि पार्श्वभूमीत दिसणारे लोक देखील व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेल्या लोकांसारखेच होते. चॅनलवर असेच अनेक व्हिडीओ होते.

या १८ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये असदुद्दीन ओवेसी हे शिव तांडव स्तोत्र गाताना दिसले नाहीत. आम्हाला न्यूज18 उर्दू चॅनेलवर ६ मिनिटांची क्लिप देखील सापडली .

हे व्हिडिओ कर्नाटकातील विजापूर येथील जाहीर सभेतील आहेत. सार्वजनिक सभेचे अनेक व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. परंतु कोणत्याही व्हिडिओमध्ये असदुद्दीन ओवेसी शिव तांडव स्तोत्र गाताना दिसत नाहीत.

ओवेसी यांच्या फेसबुक प्रोफाइलवरही थेट प्रक्षेपण उपलब्ध होते.त्यातही अशी क्लिप नव्हती.

मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला व्हिडिओ काळजीपूर्वक तपासला तर AIMIM नेत्याच्या चेहऱ्यावरील हावभाव वेगळे, अनैसर्गिक आणि ओठांची हालचाल दिसते. तसेच व्हिडिओमध्ये असे दिसून येते की त्याचे डोळे बराच वेळ मिटलेले आहेत. यावरून व्हिडिओ एडिट केला असल्याचे स्पष्ट होते.

हे ही वाचा<< स्मृती इराणींचा बेली डान्सर पोशाखात फोटो? निवडणुकांआधी वेगळाच वाद, लोकांचा संताप पण ‘हा’ मुद्दा नीट पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा शिव तांडव स्तोत्र गातानाचा व्हिडीओ एडिट केलेला आहे.