Viral Video Today: डिसेंबर महिना आला की सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ अक्षरशः धुमाकूळ घालू लागतात. प्रत्येक नवदांपत्य आपल्या लग्नाचा सोहळा खास करण्यासाठी काही ना काही हटके करण्याचा प्रयत्न करत असतं. काहींची रॉयल एंट्री तर काहींचा भन्नाट डान्स, काहींचे कमाल हटके कपडे तर काहींच्या रुखवताचा थाट.. आजवर आपणही असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. पण आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्याला कशाचीच तोड नाही. जबरदस्ती लग्न असं नुसतं वाचलं तरी आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एखादी मुलगी जिचं मनाविरुद्ध लग्न लावून दिलेलं आहे. पण आता व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सगळा उलट खेळ पाहायला मिळतोय.

एका मुस्लिम जोडप्याच्या लग्नातील हा व्हिडीओ असून यामध्ये नवरी चक्क नवऱ्याच्या डोक्यावर बंदूक रोखून उभी असल्याचे दिसत आहे. निकाहनामा वर सही करण्यासाठी ती त्याला करतोयस की नाही? असे विचारते ज्यावर हा नवरा करतोय मी असे उत्तर देतो. यावेळी नवरदेवाच्या चेहऱ्यावर हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडिओ पाकिस्तानी जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला होता.

तिने नवऱ्यावर बंदूक रोखली आणि..

हे ही वाचा<< Video: पाण्यात पेटवली आग, उडवला भडका; डुबकी घेऊन जेव्हा वर आला तेव्हा तोंड…तुफान Viral होतोय ‘हा’ थरार

“जेव्हा तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडशी लग्न करता!” कॅप्शनसह शेअर केलेला हा व्हिडीओ केवळ गमतीत बनवण्यात आला होता. यावरून या जोडप्याचं बॉण्डिंग दिसून येतं. आतापर्यंत या व्हिडिओला तब्बल ३.७ मिलियन व्ह्यूज आहेत तर ३४ हजाराहून अधिकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान व्हिडिओवर कमेंट करणाऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. काहींच्या मते हा असला खेळ करण्याची काहीच गरज नव्हती असे दिसत आहे तर काहींनी आपल्याला अशी बायको कधी मिळेल असा प्रांजळ प्रश्न या व्हिडिओवर केला आहे. काहींनी तर हा व्हिडीओ फारच गांभीर्याने घेऊन जर एखाद्या मुलाने हे केलं असतं तर.. असा प्रश्नही केला आहे.