Video: साहसाच्या नावाखाली प्रेयसीला डोंगरावरून ढकलले, भीतीने किंचाळत तरुणीने हवेतच केलं ब्रेकअप

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

lover pushed the girlfriend by taking her to the hill
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (फोटो: @MorissaSchwartz / Twitter )

कधी कधी काहीतरी चांगलं करण्याच्या नादात प्रकरण उलटं पडतं. असेच एका प्रेमी युगुलाच्या बाबतीत घडले. ते दोघं अ‍ॅडवेन्चर ट्रीपला गेले होते. पण साहसाच्या शोधात, त्याच्या प्रेमाचा त्याग करण्याची वेळ आली. खरंतर प्रियकराच्या खतरनाक विनोदाने प्रेयसीला राग आला. प्रियकराने प्रेयसीला शेकडो फूट उंच डोंगरावर नेऊन ढकलले. तिनेही जमिनीवर येण्यापूर्वी तिने आरडाओरडा करून ब्रेकअपची घोषणा केली. प्रत्यक्षात दोघेही बंजी जंपिंगसाठी गेले होते. म्हणजेच ब्रेकअप साहसामुळे झाले.

प्रियकर आणि प्रेयसी दोघेही बंजी जंपिंगसाठी उंच टेकडीवर गेले होते. मात्र, तेथे पोहोचल्यावर उंची पाहताच मुलीने उडी मारायला नकार दिला. तिची उडी मारण्याची मानसिक तयारीही होत नव्हती. जी खूप सामान्य गोष्ट आहे. सर्व सुरक्षा व्यवस्था असूनही, अत्यंत उंचीवरून उडी मारणे प्रत्येकाला जमत नाही.

(हे ही वाचा: Video: भारतीय खेळाडूला त्रास देणाऱ्या चाहत्यांची विराट कोहलीने घेतली शाळा; व्हिडीओ व्हायरल)

पाहा व्हायरल व्हिडीओ:

(हे ही वाचा: मारामारी करताना दोन बैल घुसले शोरूममध्ये, घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल)

उंची पाहताच अनेकांची तब्येत बिघडू लागते. अशा स्थितीत त्या मुलीची भीती अजिबात असामान्य नव्हती. पण प्रियकरानेही ती पूर्णपणे तयार होण्याआधीच तिला जोरदार धडक दिली आणि दुसऱ्याच क्षणी ती हवेत तरंगताना दिसली. सर्व सुरक्षा व्यवस्था सुरळीत ती इतकी घाबरली की प्रेमाच्या या कृत्याने तिला धक्का बसला आणि हवेत झुलत ब्रेकअपची घोषणा केली. @MorissaSchwartz या ट्विटर अकाउंटवर हा मजेदार व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video bungee jumping lover pushed the girlfriend by taking her to the hill ttg

Next Story
Video: भारतीय खेळाडूला त्रास देणाऱ्या चाहत्यांची विराट कोहलीने घेतली शाळा; व्हिडीओ व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी