Delhi Couple Viral Romance Video: दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ अनेकांच्या भुवया उंचावत आहे. यात तुम्ही पाहू शकता, चालत्या बाईक वरुन एक तरुण जोडपं प्रवास करत असताना तरुणाने तरुणीला बाईकच्या टाकीवर बसवून भररस्त्यातच रोमान्स करायला सुरुवात केली होती. या व्हिडीओमध्ये तरुण बाईक चालवत आहे आणि त्याच्यापुढे एक तरुणी बसली आहे. जी त्याला मिठी मारत आहे. या व्हिडिओबाबत एक नवीन अपडेट सध्या समोर येत आहे. पोलिसांनी या व्हिडिओवरून तरुणाईची सुद्धा कानउघाडणी केली आहे तसेच यावर रीतसर कारवाई सुद्धा करण्यात आल्याचे सांगितले आहे,
प्राप्त माहितीनुसार, सदर प्रकरणी गुरुवारी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाहतूक नियमाचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने बाईक चालवणाऱ्या तरुणाला ११,००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत दिल्ली पोलिसांनी ट्विटमध्ये कारवाई संदर्भात माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितले की त्यांनी त्या व्यक्तीवर हेल्मेटशिवाय, विना परवाना आणि धोकादायकपणे वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
Viral Video आहे तरी काय?
हे ही वाचा<< मुंबई लोकलमध्ये ‘आई’ने बाळासाठी लावली डोक्याची बाजी; Video पाहून लोकं म्हणाली, “मराठी बाई म्हणजे…”
दरम्यान, काही ट्विटर वापरकर्त्यांनी दिल्ली पोलिसांच्या ‘तत्पर प्रतिसादा’बद्दल कौतुक केले, तर काहींनी ११,००० रुपये दंड पुरेसा आहे का? असा प्रश्न केला आहे.”जे निर्लज्जपणे इतरांचा जीव धोक्यात घालतात, त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी देखील निलंबित करणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आर्थिक दंड ही फार प्रभावी शिक्षा वाटत नाही” असे अनेकांनी पोलिसांच्या ट्वीटवर कमेंट करत लिहिले आहे. आश्चर्य म्हणजे यापूर्वी देशातील विविध भागांमध्ये असाच प्रकार घडला होता आणि तेव्हाही असेच दंड ठोठावण्यात आले होते तरीही यातून इतरांनी काहीही धडा घेतल्याचे दिसत नाही.