Drunk Teacher Viral Video: नाव मोठं लक्षण खोटं ही म्हण तुम्ही ऐकली असेल ना? ऐकलीच कशाला, आजपर्यंत तुमच्याही आयुष्यात अगदी या म्हणीला साजेशी माणसं आलीही असतील, हो ना? अनेकदा आपण ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतो त्यांच्याच हातून असं काही घडतं की आपल्याला विश्वासही ठेवता येत नाही. असाच काहीसा प्रकार एका प्राथमिक शाळेत घडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगडमधील बस्तर येथील सरकारी शाळेत एक शिक्षक चक्क दारूच्या नशेत डुलत डुलत शाळेत पोहोचला होता. मग काय, एरवी चांगलं वाईट शिकवणाऱ्या शिक्षकाची ही अवस्था बघून विद्यार्थी इतके चिडले होते की त्यांनी त्या शिक्षकालाच आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवला.

आपण व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, प्राथमिक शाळेतील विद्यार्थी दुचाकीवरून एका व्यक्तीचा पाठलाग करताना दिसत आहेत. स्नेहा मोरदानी नावाच्या सोशल मीडिया युजरने X वर हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “बस्तरमध्ये, एक शिक्षक मद्यधुंद अवस्थेत शाळेत आला होता तेव्हा मुलांनी त्याला धडा शिकवण्याची जबाबदारी आपल्या हाती घेतली. या शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्गात शिवीगाळ केला होता ज्याला कंटाळून मुलांनी पाठलाग करत त्याला शूज आणि चप्पल फेकून मारले. यानंतर शिक्षक पळून गेला. व्हिडिओमध्ये कैद झालेल्या या घटनेने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.”

फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील पिलीभट्टा प्राथमिक शाळेतील हा शिक्षक रोजच दारूच्या नशेत शाळेत येतो. मुलांना शिकवण्याऐवजी तो अनेकदा वर्गात पडून यायचा. मुलांनी त्याला शिकवायला सांगितल्यावर तो त्यांना शिवीगाळ करून हाकलून द्यायचा. विद्यार्थी त्याला तसेही कंटाळले होते. गेल्या आठवड्यात तो दारू पिऊन पुन्हा शाळेत आला आणि मुलांनी त्याला शिकवायला सांगितल्यावर पुन्हा शिवीगाळ करायला सुरुवात केली.

हे ही वाचा<< विराट कोहलीची आजवरची सर्वात सुंदर व कठीण रांगोळी; पाण्यावर टिपला चेहऱ्याचा प्रत्येक बारकावा, पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यावेळी मात्र वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी चप्पला काढून त्याला फेकून मारायला सुरुवात केली. यावेळी गोंधळून गेलेल्या मद्यधुंद शिक्षकाने आपली बाईक सुरू केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मुलं इतकी चिडली होती की त्यांनी मागे पळत जाऊन चप्पल आणि बूट शिक्षकावर फेकले. हा प्रकार लोकांनी शिक्षकावर तर टीका केली आहेच पण जर शिक्षक वारंवार शाळेत दारू पिऊन येत होता तर शाळेच्या अधिकाऱ्यांनी त्याला पहिल्या वेळीच हाकलून का दिले नाही असाही प्रश्न अनेकांनी केला आहे.