scorecardresearch

तिने बाबांचा हात धरून पहिल्यांदा उडवलं विमान अन्… ‘या’ पायलटचा Video का होतोय व्हायरल?

Viral Video: १५ लाखाहून अधिक लाईक्स असलेल्या या व्हिडिओवर हजारो कमेंट्स आहेत. लेडी पायलटचा हा व्हिडीओ नेमका काय आहे हे नक्की पाहा

तिने बाबांचा हात धरून पहिल्यांदा उडवलं विमान अन्… ‘या’ पायलटचा Video का होतोय व्हायरल?
तिने बाबांचा हात धरून पहिल्यांदा उडवलं विमान अन्… (फोटो: इंस्टाग्राम)

Girl Flying Plane With Father Viral Video: आई वडिलांचं बोट धरून चालायला शिकलेल्या लेकरांची जेव्हा गरुड झेप घेण्याची वेळ येते तेव्हा त्या पालकांच्या डोळ्यात दिसणारा अभिमान निराळाच असतो. अशाच एका तरुणीने अलीकडेच आपल्या पायलट वडिलांसह को-पायलट म्हणून खरोखरच उंच आकाशात भरारी घेतली. हा व्हिडीओ पोस्ट करताना तिने लिहिलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. बाप- लेकीच्या सुंदर नात्याचं दर्शन घडवणाऱ्या या व्हिडिओत तिने आपल्या पहिल्याच विमान उड्डाणाचा अनुभव शेअर केला आहे.

@saniyachati या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये सानिया व तिचे पायलट बाबा हे आपल्या फ्लाईटसाठी तयार होताना दिसत आहेत. सानियाने लिहिले की, “आजवर अनेकदा वडिलांसह प्रवास केला आहे आणि आज पुन्हा करतेय पण यावेळी त्यांच्या बाजूला माझ्या गणवेशात बसून विमान उड्डाण करत प्रवास करणार आहे. आज मी जिथे आहे ते माझ्या बाबांमुळे आहे, त्यांनी मला वेळोवेळी पाठिंबा देऊन पायलट बनण्यासाठी प्रोत्साहन दिले.” पायलट फॅमिली असे हॅशटॅग देऊन सानियाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

बाबांचा हात धरून पहिल्यांदा उडवलं विमान अन्…

हे ही वाचा<< ८० वर्षाच्या आजींचं नऊवारी नेसून पॅरासेलिंग; नातीने Video शेअर करत लिहिलं, “तू सोडून गेलीस पण..”

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी बाप- लेकीची ही सुंदर केमिस्ट्री खूप आवडली आहे. खरंच एका यशस्वी बाईच्या मागे समाजाच्या विरुद्ध जाऊन पाठिंबा देणारे वडील असतात अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. १५ लाखाहून अधिक लाईक्स असलेल्या या व्हिडिओवर हजारो कमेंट्स आहेत. तू तुझ्या यशाचा वाटा तुझ्या वडिलांना दिलास, त्यांचा आदर ठेवलास इथेच तू जिंकलीस असेही काहींनी म्हंटले आहे. तुम्हाला हा गोड व्हिडीओ कसा वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 11:04 IST

संबंधित बातम्या