Molestation Case: श्रद्धा वालकर या तरुणीच्या खुनामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे, अशातच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील एक घटना सध्या चर्चेत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एक तरुणीने वेगाने धावत्या रिक्षातून उडी मारल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्राप्त माहितीनुसार रिक्षा चालकाने या तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रयत्न केल्याने घाबरून तिने रिक्षातून उडी मारल्याचे समजत आहे. या प्रकरणात पीडित तरुणीच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून तिला आता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी रिक्षाचालक सय्यद अकबर हमीद याला ताब्यात घेतल्याचे समजत आहे.

घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलीने रिक्षातून उडी मारताच पादचाऱ्यांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली. तसेच या तरुणीला मदत करण्यासाठी इतर वाहनेही थांबली. या घटनेनंतर औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलिस ठाण्यात मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी वाचा- Video: लगट करणं पडलं महाग! महिलेचा डान्स बघून बेभान तरुण स्टेजवर चढला; तिने कंबरेवर उचललं अन पार…

अन तिने चालत्या रिक्षातून घेतली उडी

आणखी वाचा- श्रद्धा पाठोपाठ शिल्पाचा बळी; प्रियकराने गळा चिरून केला खून, Video पोस्ट करून म्हणतो, “बेवफा बाबू स्वर्गात…”

इंडिया टुडेला, पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार “अल्पवयीन विद्यार्थिनी उस्मानपुरा भागातून रिक्षाने तिच्या घरी जात असताना चालकाने अश्लील बोलून मुलीचा विनयभंग केला, त्यानंतर ही मुलगी काहीशी अस्वस्थ झाली. सिल्ली खाना संकुल या परिसरात पोहोचताच तिने न राहावरून घाबरून गेल्याने रिक्षातुन बाहेर उडी घेतली. चालत्या रिक्षातून उडी घेतल्याने तरुणी रस्त्यावर जोरदार आदळली व तिच्या डोक्याला दुखापत झाली. रस्त्यावर काही पादचाऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले.