How Matchsticks Are Made Video: एखादी गोष्ट घडायला खूप वेळ लागते पण संपायला सेकंदही पुरतो हे तर तुम्हीही ऐकलं असेल. फक्त बोलायचं म्हणून तर प्रत्यक्ष सुद्धा ही बाब अनेक गोष्टींना लागू होते. बघा ना तुम्ही एखादा पदार्थ बनवायला घेता, खरेदीपासून ते चिरणे, शिजवणे, तळणे, वाढणे यामध्ये साधारण तासभर तरी जातोच. पण खायला बसल्यावर मोजून १० मिनिटात पदार्थ फस्त सुद्धा होतो. आज सुद्धा आपण एक असंच उदाहरण समोर पाहणार आहोत. प्रचंड महागाईच्या काळातही अजूनही जी गोष्ट एक ते दोन रुपयांना मिळते अशी काडेपेटी कशी तयार होते याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झाडाच्या खोडापासून ते बॉक्समध्ये भरेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया या काही सेकंदांचं व्हिडिओमध्ये शेअर करण्यात आली आहे.

इंस्टाग्रामवर, @thefoodiehat या अकाउंटवर अभिषेक या क्रिएटरने सदर व्हिडीओ पोस्ट केला होता. कॅप्शननुसार ही क्लिप तामिळनाडू मध्ये शूट करण्यात आली आहे. हे ठिकाणी देशातील सर्वात मोठे काडेपेटी उत्पादनाचे स्थळ म्हणून ओळखले जाते असेही कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले आहे. तुम्ही बघू शकता मोठमोठ्या मशिन्स वापरून अगदी बारीक बारीक काम सुद्धा अत्यंत लक्षपूर्वक केले जात आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला काही कामगार झाडाचे खोड फोडून त्याला पातळ शीट्स मध्ये बदलताना दिसतात आणि मग या चादरी इतक्या बारीक शीट्सना कापून माचीस तयार केली जाते. नंतर चॉकलेटचा झरा वाटावा अशा ज्वलनशील पदार्थाच्या पेस्टमध्ये या काड्यांचे तोंड बुडवले जाते. या तयार माचीसच्या काड्या पेट्यांमध्ये भरून मग पॅक केल्या जातात. इतकी सविस्तर प्रक्रिया असणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वर वाचलेले पहिले वाक्य नक्की आठवले असेल हो ना?

Video: काडेपेटी कशी तयार होते?

हे ही वाचा<< “डेटिंग ॲपवर भेटलात, लग्न जुळवणाऱ्या..”, लग्नाचं आश्वासन देत बलात्कार केल्याच्या आरोपाबाबत कोर्टाचे मोठे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला साधारण ४ लाखाहून अधिक लाईक्स आहेत. कित्येक लोकांनी यावर कमेंट करत स्वच्छतेची दाद दिली आहे. काहींनी यातून आयुष्याचे धडे मिळतात अशा कमेंट केल्या आहेत तर काहींना हा प्रश्न पडलाय की एवढी मेहनत करून जर १ च रुपयाला विकत असतील तर यांना फायदा तरी कसा होतो? एक झाड लाखो माचीसच्या काड्या बनवू शकते तर एक माचीसची काडी कित्येक झाडांना संपवू शकते अशा कमेंट्स यावर अनेकांनी केल्या आहेत. तुम्हाला या व्हिडिओकडे बघून काय शिकायला मिळतंय नक्की सांगा.