Indian Aunty Wedding Dance Viral Video: सध्या आपल्याकडे लग्नसराई सुरु आहेत त्यामुळे हळदीत नाचताना ,वरातीत नाचतानाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी बरेचसे व्हिडीओ हे खूप गमतीशीर आणि पोट धरून हसायला लावणारे असतात. तर काहींना पाहून आपले पाय सुद्धा थिरकायला सुरु होतात. या महिलेचा आत्मविश्वास आणि ऊर्जाही पाहण्यासारखी आहे. डान्स करताना तिने कमालीची एनर्जी दाखवली आहे.
आपण सहसा पाहतो किंवा अनुभवतो की नृत्यासारख्या कलेचा संबंध सुद्धा जाड व बारीक असण्याशी जोडला जातो. त्यात चारचौघात म्हणजेच एखाद्या कार्यक्रमात, किंवा मिरवणुकीत नाचताना तर काहीजण विनाकारण आपल्या वजनाचा संकोच बाळगतात किंवा सभोवतालची मंडळीच त्यांना तसे करायला भाग पाडतात. पण सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका महिलेने हे सगळे समज, संकोच मोडून काढले आहेत. एक काकू इतक्या बेभान होऊन वरातीत नाचताना दिसतायत ज्यांना बघून आजूबाजूच्यांमध्येही उत्साह संचारतो.
Video: काकूंचा डान्स व्हायरल
हे ही वाचा<< १५ वर्षं सुट्टीवर असताना पगारवाढ न मिळाल्याने कर्मचाऱ्याने कंपनीला कोर्टात खेचलं, निर्णय वाचून व्हाल थक्क
महिलेचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर _adit_xs नावाच्या आयडीवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत 5.8 मिलियन व्ह्यूज तर 58 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. विविध मजेशीर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ चांगलाच गाजला असल्याचे दिसते. अनेकांनी ह्या व्हिडिओला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यापैकी एका नेटकऱ्यांनी काकूंच्या एनर्जीला सलाम असे म्हटले आहे.