Viral Video: आपल्या पाळीव प्राण्यांना बाळासारखं वागवणारे अनेक मालक तुम्ही पाहिले असतील. कधी कधी तर अगदी आपल्या मांडीवर घेऊन पाळीव प्राण्यांच्या तोंडात घास भरवायला सुद्धा हे पालक घाबरत नाहीत. खरंतर ते प्राणीही आपल्या मालकांना तेवढा जीव लावतात. असंच एक उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण प्राणी म्हणजे एखादा कुत्रा किंवा मांजर नसून चक्क एक भलीमोठी मगर आहे. तलावात एका बोटमध्ये बसून एक माणूस चक्क मगरीला खाऊ घालायला गेला आहे. बरं हे खाऊ घालणंही साधंसुधं नाही तर या माणसाने चक्क मगरीला आपल्या दोन्ही पायावर उचलून घेतलं आहे. तुम्हालाही हा व्हिडीओ बघून नक्कीच धक्का बसेल.

तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की, ही व्यक्ती लहानश्या नावेत बसली आहे. त्याने हातात काही मीटचे तुकडे आणले आहेत. कदाचित असं खाऊ घालण्याचा प्रकार या माणसाला व मगरीला सवयीचा असावा म्हणूनच ती मगरही आरामात त्या माणसाच्या पायावर येऊन बसते, मग तो मगरीला पायावर उचलून घेतो आणि तिला प्रेमानी मीटचे तुकडे भरवतो. खाऊन झाल्यावर या मगरीची प्रतिक्रिया पाहून तर आपणही थक्क व्हाल.

प्रेमाने जिंकली मगर..

हे ही वाचा<< हल्ला करून चुकलास आता… माकडाने किंग कोब्राला पार रडवलं; Video पाहून तुम्हालाही येईल दया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, युजर्सच्या कमेंट्स नुसार हा व्हिडीओ फ्लोरिडा मधील असल्याचे म्हंटले जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून याला तब्बल ४० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी कमेंट करून हे फक्त फ्लोरिडामध्येच होऊ शकतं. मगर त्याच्यासह किती कम्फर्टेबल आहे, मला तर विश्वासच बसत नाही असेही काहींनी म्हंटले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.