Animal Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ दरदिवशी व्हायरल होत असतात. कधी गोंडस खेळकर कुत्रे- मांजरी तर कधी आक्रमक वाघ सिंह हे सर्व पाहायला नेटकऱ्यांना फारच आवडते. नटखट माकडांचे व हुशार नागाचे व्हिडीओ सुद्धा अनेकदा ट्रेंडिंग असतात. आजही असाच एक थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एरवी तुम्हाला प्रश्न केला की नागाच्या किंवा सापाच्या पुढे कोणता प्राणी शक्तिशाली ठरेल तर तुम्ही कोणाचे नाव घ्याल… यादी तशी मोठी असली तरी माकडाचं नाव नक्कीच त्यात टॉप १० मध्ये येणार नाही, हो ना? पण तुम्हाला माहित आहे का अलीकडेच एका माकडाने इतक्या चतुराईने भल्या मोठ्या नागाला जेरीस आणलं की ते पाहून नेटकऱ्यांना विश्वासच बसत नाहीये.

व्हायरल होणारा व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक माकड आपलं निवांत बसलं आहे आणि एक किंग कोब्रा नागोबा आपला फणा उंचावून त्याच्या दिशेने जातात. किंग कोब्रा हा सर्वात धोकादायक सापांपैकी एक मानला जातो. हा असा साप आहे की, त्याने एकदा आपल्या भक्ष्याला चावा घेतला की त्याच्यापासून निसटणे जवळपास अशक्यच होते.

माकड कुठल्या आत्मविश्वासात आहे देव जाणे पण ते त्या किंग कोब्राला पार धु धु धुवून काढते. कधी त्याचा फणा पकडून तरी कधी शेपटी खेचून माकडाने किंग कोब्राला असा काही धडा शिकवला ते पाहून खरच माकडही हुशारमाणसांचे पूर्वज आहेत हे सिद्ध होईल.

माकडाने केली किंग कोब्राची धुलाई

हे ही वाचा<< ३ सिंहिणींसमोर अडकला ‘तो’; जीव वाचवायची धडपड अन् तेवढ्यात.. Viral Video मध्ये पाहा थरार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असताना अनेकांनी यावर टीकाही केली आहे. ज्या पद्धतीने माकडाला बांधून ठेवलं आहे त्यावरून तरी हा ठरवून केलेला प्रकार वाटतो. काही लाईक्ससाठी तुम्ही प्राण्यांच्या जीवाशी खेळ करणे थांबवले पाहिजे असे म्हणत नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.